मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, नेमकं काय प्रकरण वाचा

जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, नेमकं काय प्रकरण वाचा

जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, तपासात जे आढळलं ते पाहून पोलीसही चक्रावले

जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, तपासात जे आढळलं ते पाहून पोलीसही चक्रावले

जी सासरी मृत्युमुखी झाली ती माहेरी जिवंत सापडली, तपासात जे आढळलं ते पाहून पोलीसही चक्रावले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

सीतामढी: जी सासरी मेली असा पोबारा करण्यात आला ती महिला माहेरी जिवंत सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा गुंता सोडवताना मोठा धक्का बसला. सासरचे आणि नवरा स्वत:ला या प्रकरणात निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे पतीला 6 महिन्यांचा कारावास सहन करावा लागला.

धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलेला जिवंत जाळल्याची तक्रार करण्यात आली, तीच माहेरी जिवंत सापडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळमधील रहिवासी असलेल्या विनोद यांनी आपली मुलगी हिरा देवीला तिच्या सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला जिवंत जाळलं असे आरोप केले.

हेही वाचा-बदला घेण्यासाठी पतीनं 30 मित्रांना... हादरलेल्या पत्नीची पोलिसांकडे धाव!

या प्रकरणातील आरोपी पतीला अटक केली मात्र हे प्रकरण तिथे थांबलं नाही. पोलीस या प्रकरणाचा छडा लावत होते. याच दरम्यान, पोलिसांनी शशीची पत्नी हिरा देवी हिला तिच्या माहेरून ताब्यात घेतलं. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शशी कुमार यांची पत्नी हिरा देवी माहेरी सुरक्षित असल्याचं समोर आलं.

पोलिसांकडे हिरा देवीचा छळ करून तिची हत्या केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पुराव्या अभावी सासरची मंडळी हे खोटं असल्याचं सिद्ध करू शकले नाहीत. तर पतीला 6 महिने तुरुंगात राहावं लागलं. सासरचे बाकी लोक त्यानंतर फरार झाले. तर या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हिरा देवा जिवंत असल्याचं समोर आलं.

ही धक्कादायक घटना बिहारच्या सीतामढी परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची चर्चा गावात सध्या सुरू आहे. या प्रकरणी तिच्यासह कुटुंबावर खोटी केस दाखल केल्या प्रकरणी कारवाई होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Bihar