मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'भावाच्या अतृप्त आत्म्याने चिरला भावाचा गळा', मृतकाच्या शेजारणीचा दावा

'भावाच्या अतृप्त आत्म्याने चिरला भावाचा गळा', मृतकाच्या शेजारणीचा दावा

भिवंडीमधून एक खुनाची घटना समोर येत आहे. दरम्यान मृत इसमाच्या शेजारणीने असा दावा केला की त्याच्या भावाच्या भटकणाऱ्या आत्म्यानेच त्याचा गळा चिरून तरुणाची हत्या केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

ठाणे, 08 मार्च : भिवंडीमधील नारपोली या भागात खुनाची एक विचित्र घटना समोर आली आहे. ठाण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या याठिकाणी 31 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला आहे. गळा कापून या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील विचित्र बाब म्हणजे, या मृत इसमाच्या शेजारणीने असा दावा केला की त्याच्या भावाच्या भटकणाऱ्या आत्म्यानेच त्याचा गळा चिरून तरुणाची हत्या केली आहे. शेजारणीच्या अशा दाव्यामुळे पोलीसही अचंबित झाले आहेत.

(हे वाचा-प्रणय हत्याकांड: गर्भवती लेकीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या बापाचा संशयास्पद मृत्यू)

मृत तरुणाचं नाव तुळशीराम चव्हाण आहे. या शेजारणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा तरुण त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर घरी एकटाच राहायचा. त्यानंतर त्याचा भाऊ त्याच्या इथे राहायला आला होता. मात्र यावर्षी 2 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने त्यांना अशी माहिती दिली होती की, 'तुळशीराम चव्हाणने आम्हाला शुक्रवारी रात्री सांगितलं की, त्याच्या भावाचा आत्मा या घरामध्ये फिरत आहे आणि तो त्याच्यावर रात्री हल्ला करु शकतो.'

(हे वाचा-हनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ')

पोलीस पुढे म्हणाले की, 'महिलेने त्या रात्री तुळशीराम चव्हाणला त्या रात्री तिच्या घरी झोपू दिलं. यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच शनिवारी पहाटे 5 वाजता तो निघून गेला आणि परत आलाच नाही. सकाळी 7.30 च्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला. त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.' या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याचप्रमाणे खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime