मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पहिल्यांदा अनोळखी तरुणासोबत डेटवर गेली अन् तिथेच झाला मृत्यू; तरुणीसोबत घडलं विपरित

पहिल्यांदा अनोळखी तरुणासोबत डेटवर गेली अन् तिथेच झाला मृत्यू; तरुणीसोबत घडलं विपरित

एक संशोधन करण्यात आलं. त्यात प्रेम हे केवळ पहिल्याच नाही, तर चौथ्या नजरेत होतं, असा दावा करण्यात आला

एक संशोधन करण्यात आलं. त्यात प्रेम हे केवळ पहिल्याच नाही, तर चौथ्या नजरेत होतं, असा दावा करण्यात आला

Metro च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी खुलासा केला की बम्बल डेटवर गेल्यानंतर महिलेचा तिथेच मृत्यू झाला.

नवी दिल्ली 28 जानेवारी : 23 वर्षाच्या एका तरुणीची Bumble dating अॅपवर (Online Dating App) एका तरुणासोबत ओळख झाली. यानंतर ती त्याच्यासोबत डेटिंगवर गेली होती. मात्र तिथेच तिचा मृत्यू (Girl Died During First Dating) झाला. पोलीस रिपोर्टमध्ये असं समोर आलं, की भरपूर नशा केल्यानं तिचा मृत्यू झाला.

तरुणीचं अपहरण करत सामूहिक बलात्कार, नंतर दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये पीडितेची धिंड

Metro च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी खुलासा केला की बम्बल डेटवर गेल्यानंतर महिलेचा तिथेच मृत्यू झाला. २३ वर्षीय लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू तीव्र नशेमुळे झाला होता. अधिकाऱ्यांनी हा खुलासा तेव्हा केला, जेव्हा लॉरेनच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर वांशिकदृष्ट्या असंवेदनशील असल्याचा आरोप केला.

अमेरिकेमध्ये कनेक्टिकटची 23 वर्षीय लॉरेन स्मिथ-फील्ड्स हिचा मृत्यू फेंटॅनाइल, प्रोमेथाझिन, हायड्रॉक्सीझिन आणि अल्कोहोलच्या एकत्रित परिणामांमुळे झालेल्या तीव्र नशेमुळे झाला होता. बंबल या डेटिंग अॅपवर ती एका व्यक्तीसोबत डेटवर गेली, तेव्हा ही घटना घडली. कनेक्टिकटच्या मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी सांगितलं की या घटनेत तिच्यासोबत काही विपरित घडल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिचा मृत्यू हा अपघात मानला जात आहे.

तुम्हाला व्हिडीओ कॉलमध्ये इंटरेस्ट आहे का? या वाक्याने अनेकांचं आयुष्य उध्वस्त!

या आकस्मिक मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आता स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारी तपास सुरू आहे. स्मिथ-फिल्ड्सच्या कुटुंबीयांना असं वाटतं की पोलिसांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलं नाही. स्मिथ-फील्डच्या 12 डिसेंबरच्या मृत्यूनंतर, पुरावे गोळा करण्यासाठी विभागाला दोन आठवडे लागले. दोन दिवस उलटूनही तिच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. तिच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे, की लॉरेनचा मृत्यू तीव्र नशेमुळे झाला असता, तर तिने स्वतःच्या इच्छेने ही नशा केलेली नसणार. याप्रकरणी पोलीस दिशाभूल करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Girl death, Online dating