पाटणा, 23 जानेवारी: प्रेमाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेतील आरोपी तरुणाचे गेल्या अडीच वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचाही विचार केला होता. पण दोघांची जात वेगवेगळी असल्याने पालकांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे तरुणीनेही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यास नकार दिला. या रागातून त्याने प्रेयसीचीच निर्घृणपणे गळा चिरून तरुणीची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील जक्कनपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. येथील जयप्रकाश नगरमध्ये राहणाऱ्या अंशु कुमारी नावाच्या तरुणीची गळा चिरून निर्दयी हत्या करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने मारेकऱ्याची ओळख पटवून बिहारशरीफ मधून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मृत तरुणीनेच आरोपी प्रियकराला घरी बोलावलं होतं
गुरूवारी घरी कोण नसणार आहे. त्यामुळे घरी भेटायला येऊ शकतो, अशी माहिती मृत तरुणीनेच आपल्या प्रियकराला दिली होती. पण घरच्यांच्या विरोधात जावून लग्न करण्यास नकार दिलेल्या तरुणीला संपवण्याचा प्लॅन आरोपी तरुणाने अगोदरच बनवला होता. या संधीचा फायदा घेवून आरोपी तरुण खिशात एक चाकू घेऊन तरुणीच्या घरी पोहचला. त्यानंतर त्याने आणखी एकदा लग्न करण्याबाबत विचारणा केली. यावेळीही तरुणीने घरच्यांच्या विरोधात जावून लग्न करण्यास नकार दिला.
(हे वाचा-शिपाईच पुरवत होता कैद्यांना चरस, नागपूर जेलमधील धक्कादायक घटना)
गळा चिरून केली हत्या
तरुणीने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपी प्रियकराने खिशातील चाकू काढून तरुणीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात जमनीवर पडली. जीव वाचवण्यासाठी हालचाली करू लागली, पण आरोपी तरुणाने तिच्या गळ्यावर आणखी एक वार केला.
(हे वाचा-अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या; नदीत 100 किमी दूर फेकला मृतदेह)
तरुणीने जीव सोडल्याची खातरजमा केल्यानंतरच आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एक संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तपास करून पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder