Home /News /crime /

परीक्षेचा अभ्यास न झाल्यानं तरुणीची नदीत उडी, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

परीक्षेचा अभ्यास न झाल्यानं तरुणीची नदीत उडी, नंदुरबारमधील धक्कादायक घटना

एका महाविद्यालयीन तरुणीने तापी नदीच्या पुलावरुन पाण्यात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला (Girl Attempt Suicide). परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

    नंदुरबार 23 मे : आजकालची अगदी लहान मुलं किंवा तरुणही अगदी छोट्या संकटांपुढे गुडघे टेकवून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. अनेकदा या आत्महत्या मोबाईल न मिळाल्याने, गेम खेळू न दिल्यानं, एखादा हट्ट पूर्ण न झाल्याने किंवा अभ्यास न झाल्यानेही केल्या जातात. ही कारणं ऐकूनच कोणीही थक्क होतं. सध्या अशीच आणखी एक धक्कादायक घटना नंदुरबारमधून समोर आली आहे. या घटनेत एका महाविद्यालयीन तरुणीने तापी नदीच्या पुलावरुन पाण्यात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला (Girl Attempt Suicide). परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. पती-पत्नीच्या वादात 10 महिन्याच्या मुलीला खिडकीतून दिलं फेकून; जागेवरच मृत्यू नदीतील मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचले. ती सध्या सुखरूप असून तिची ओळखही पटली आहे. ही मुलगी आपल्या घरातून बाहेर पडली आणि बसने तिने प्रवास केला. यानंतर निझर तालुक्यातील वेलदा टाकीजवळ ती बसमधून उतरली आणि तिथून ती चालतच कुकरमुंडा इथल्या तापी नदीच्या पुलावर गेली. या मुलीने पुलावरुन ५०-६० फूट खाली असलेल्या पाण्यात उडी घेतली. ही बाब आसपासच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नदीतील मासेमारी करणारे तरुण सतर्क झाले. यानंतर त्यांनी या मुलीला वाचवण्यासाठी तात्काळ तिच्या दिशेने बोट नेली. मात्र वाऱ्याचा वेग जास्त होता, अशात बचावकार्यात अडथळा येऊ लागला. अखेर अनेक प्रयत्नांनंतर मच्छिमारांनी या मुलीला वाचवलं. त्यांनी तिला बोटीच्या मदतीने काठावर आणलं आणि यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. Husband Wife Dispute Nandurbar : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अंगलट, नंदुरबारमध्ये घडला धक्कादायक प्रकार या घटनेतील मुलीची ओळख पटली असून ती अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावातील रहिवासी आहे. पार्वती पाडवी असं तिचं नाव आहे. ही तरुणी बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकते आणि 15 जूनपासून तिची परीक्षा आहे. मात्र, परीक्षा जवळ आली असूनही तिचा अभ्यास झाला नव्हता. यामुळे नापास होण्याच्या भीतीने तिने हे पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Suicide attempt

    पुढील बातम्या