Home /News /maharashtra /

Husband Wife Dispute Nandurbar : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अंगलट, नंदुरबारमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Husband Wife Dispute Nandurbar : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अंगलट, नंदुरबारमध्ये घडला धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दिलवरसिंग होनजी वळवी हा व्यक्ती त्याच्या पत्नीला मारहाण करीत होता. त्याचवेळी हारसिंग कोया वळवी हा तिथे आला आणि दोघांच्या भांडणात मध्यस्थी करू लागला. यानंतर त्याने दिलवरसिंग याच्या पत्नीला त्याच्या ताब्यातून सोडविले.

  नंदुरबार, 22 मे : पती-पत्नीचं नातं (Husband Wife Relation) हे अतूट असतं. पती-पत्नी कितीही भांडले तरी एकत्र येणारच. त्यामुळे शहाण्यानेही दोघांच्या वादात पडू नये, असंही म्हटलं जातं. पती-पत्नी भांडतील (Husband Wife Dispute) आणि एकत्र येतील, असं नेहमी समाजात म्हटलं जातं. यातच नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यस्थी करणाऱ्यासोबतच धक्कादायक प्रकार  - पती आणि पत्नीच्या भांडणात एकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न (Trying to Stop Husband Wife Dispute) केला. या प्रकरानंतर मध्यस्थी करणाऱ्यासोबतच एक धक्कादायक प्रकार घडला. पत्नीला मारहाण करत असताना मध्यस्थी केल्याचा राग आल्यानंतर एका लोखंडी सळईने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. (Husband Attacked on One) ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बेलीपाडा (Belipada Taloda) येथे घडली. हारसिंग कोया वळवी, असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारहाण झाल्यानंतर हारसिंगच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी, जखमीच्या भावाने फिर्याद दिली. यानंतर एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा - Nashik Murder : भिशीचे पैसे भरण्यावरुन वाद, पत्नीने पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव
  पतीने रागात पाठीमागून केला वार - 
  मिळालेल्या माहितीनुसार, दिलवरसिंग होनजी वळवी हा व्यक्ती त्याच्या पत्नीला मारहाण करीत होता. त्याचवेळी हारसिंग कोया वळवी हा तिथे आला आणि दोघांच्या भांडणात मध्यस्थी करू लागला. यानंतर त्याने दिलवरसिंग याच्या पत्नीला त्याच्या ताब्यातून सोडविले. याचा राग दिलवरसिंग याने मनात ठेवला होता. म्हणूनच हारसिंग हा त्याच्या घराकडे परत जात असताना दिलवरसिंग वळवी हा पाठीमागून आला. यावेळी त्याने हारसिंगच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केले. या हल्ल्यात हारसिंगच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. याप्रकरणी, जखमीच्या भावाने फिर्याद दिली. यानंतर एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याने असा धक्कादायक प्रकार इथे समोर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra News, Wife and husband

  पुढील बातम्या