Home /News /crime /

पती-पत्नीच्या वादात 10 महिन्याच्या मुलीला खिडकीतून दिलं फेकून; जागेवरच मृत्यू

पती-पत्नीच्या वादात 10 महिन्याच्या मुलीला खिडकीतून दिलं फेकून; जागेवरच मृत्यू

एकमेकांसोबत झालेल्या वादानंतर दहा महिन्याच्या बाळाचा जीव घेतल्याचा धक्कादायक (Crime News) प्रकार समोर आला आहे.

  जयपूर, 21 मे : एकमेकांसोबत झालेल्या वादानंतर वडिलांनी दहा महिन्याच्या बाळाचा जीव घेतल्याचा धक्कादायक (Crime News) प्रकार समोर आला आहे. पत्नीसोबत भांडण झाल्यांतर आरोपीने मुलाला खिडकीबाहेर फेकून दिलं. गंभीर जखमेमुळे बाळाचा मृत्यू झाला. ही घटना बारा जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, किशनगंज पोलीस ठाण्यात महिलेने या घटनेबाबत गुन्हा दाखल केला.

  किशनगंज सीआय ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचा विवाह नाहरगढ येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. यानंतर अस्लम दारूच्या नशेत होता आणि त्याने पत्नी सायराला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर ती आपल्या 10 महिन्यांच्या मुलाला घेऊन किशनगंज येथील वडिलांच्या घरी आली.

  यावर तिचा पती सकाळी सासरी पोहोचला आणि पत्नीला परत नाहरगड आणण्यासाठी म्हणू लागला. यावर तिने स्वयंपाक करून निघण्यास सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि अस्लमने रागाच्या भरात 10 महिन्यांच्या चिमुरडीला त्याच्या मांडीवर घेऊन खिडकीबाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडल्याने निष्पापच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र यात तिचा मृत्यू झाला.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Rajasthan

  पुढील बातम्या