मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /औरंगाबाद : पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी, इकडे भावाला कॉल करुन तरुणाचं टोकाचं पाऊल

औरंगाबाद : पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी, इकडे भावाला कॉल करुन तरुणाचं टोकाचं पाऊल

अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो घराचा उदरनिर्वाह करायचा.

अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो घराचा उदरनिर्वाह करायचा.

अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो घराचा उदरनिर्वाह करायचा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 30 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावस भावाला व्हिडिओ कॉल करून एका 29 वर्षीय तरुणाने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागात ही घटना परवा शनिवारी घडली. . मावस भावाला व्हिडिओ कॉल करून एका 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही. अमोल उत्तम खाडे (वय-29, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मावस भावाला केला व्हिडिओ कॉल आणि -

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो घराचा उदरनिर्वाह करायचा. अमोलचे साडेतीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षाची एक मुलगी आहे. त्याची पत्नी ही गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे तो एकटाच भाड्याचा घरात राहायचा.

शनिवारी संध्याकाळी अमोलने ज्योतीनगर भागात राहणाऱ्या मावस भावाला व्हिडिओ कॉल केला आणि आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. व्हिडिओ कॉलमध्ये अमोल किचन ओट्याजवळून बोलत होता.त्याच्या गळ्यात नायलॉनची दोर होती. व्हिडिओ कॉलवर त्याला त्याच्या मावस भावाने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमोल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

हेही वाचा - नाशिक : मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुलांनी संपवलं जीवन

यानंतर नातलगांनी तातडीने अमोल राहत असलेल्या घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने आत्महत्या केली होती. याठिकाणी नातेवाईकांनी पोहोचल्यावर त्यांना अमोल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरघुती वादातून त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

First published:

Tags: Aurangabad News, Death