मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला प्रियकर, नंतर बेशुद्ध करून 70 वर्षाच्या वृद्धासह 5 लोकांचे सामूहिक दुष्कर्म

फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला प्रियकर, नंतर बेशुद्ध करून 70 वर्षाच्या वृद्धासह 5 लोकांचे सामूहिक दुष्कर्म

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कुंदा येथे राहणारा सचिन नावाचा युवक आपल्या मुलीसह स्थानिक कोचिंग सेंटरमध्ये शिकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

प्रतापगढ, 31 ऑगस्ट : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही ठिकाणी तर प्रियकराकडूनच संतापजनक कृत्य घडत आहे. अशातच आता प्रियकराने आपल्या प्रेयसीला फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन पाच जणांनी तिच्यावर दुष्कर्म केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 70 वर्षांच्या नराधमाचाही समावेश आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही सामूहिक बलात्काराची घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आहे. पोलिस महानिरीक्षक (प्रयागराज रेंज) राकेश सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आयजींनी एसपी (प्रतापगड) यांना या घटनेची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी 70 वर्षीय व्यक्तीसह पाच जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम 363, 366, 328, 376D आणि 506 आणि कलम 3 आणि 4 अंतर्गत कुंडा पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. तसेच POCSO कायद्यांतर्गत, आरोपींवर त्यांच्या अल्पवयीन मुलीला सुमारे 15 दिवस कोंडून ठेवण्याचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, कुंदा येथे राहणारा सचिन नावाचा युवक आपल्या मुलीसह स्थानिक कोचिंग सेंटरमध्ये शिकतो. 11 जुलै रोजी संध्याकाळी त्याने तिला बाहेर नेले आणि तिला चहामध्ये अंमली पदार्थ टाकून तो तिला पाजला. यानंतर आपली मुलगी बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच केवळ सचिनच नाही तर त्याचा भाऊ आणि एका वृद्धासह इतर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. यानंतर तिला 26 जुलैला दिले, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा - दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकाने अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी..

याप्रकरणी पोलिसांना सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीकडून त्यांना देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांनी आरोपींच्या सांगण्यावरून स्थानिक पोलिसांत शेळी चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला. आयजी राकेश सिंह म्हणाले, एसपी (प्रतापगड) यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस या आरोपांची चौकशी करून त्यानुसार कारवाई करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

First published:

Tags: Gang Rape, Police, Rape accussed, Up crime news