दिल्ली, 31 ऑगस्ट : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्लीत आता दोन ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बल्ताकाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणांत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
जसोला परिसरात अल्पवयीन मुलीला पकडून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे धक्कादायक कृत्य केलं. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी ती घरी एकटीच झोपली होती आणि यावेळी घराचे दार उघडे होते. त्यानंतर आरोपी शांतपणे आत आला आणि गेट बंद करून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिला बंद खोलीत बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्या तोंडात कापड भरले. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, आरोपी तीन महिन्यांपूर्वीच येथे भाड्याच्या घरात आला होता. मुलीच्या अंगावर बेल्टच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सरिता विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेचे मेडिकल करून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय.. तरुणीने नकार दिला तर त्याने थेट..
अश्लील व्हिडिओ काढला आणि...
यासोबतच दिल्लीतील नरैना भागात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका भाडेकरूने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने बळजबरीने घरात घुसून बलात्कार केला आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Rape accussed, Rape news