रांची 26 सप्टेंबर : हादरवून टाकणारी एक बलात्काराची घटना झारखंडमधून समोर आली आहे. झारखंडमधील पलामू येथे 22 वर्षीय विवाहित महिलेवर सहा जणांनी चार तास बलात्कार केला. या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून इतरांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर सातबरवा पोलीस ठाण्याचे प्रभारी ऋषिकेश कुमार राय यांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी एमएमसीएच मेदिनीनगर इथे पाठवलं आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिली. पीडित महिला सासरच्यांशी भांडण झाल्यावर पायीच माहेरी निघाली होती. सायंकाळी तिला सासरच्या घरी नेण्यासाठी लोक तिची समजूत घालण्यासाठी आले, मात्र महिलेनं सासरी जाण्यास नकार दिला. मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं त्यानंतर आई-वडिलांनी तिची समजूत घातल्यानंतर तिला सासरच्या घरी परत पाठवलं. दरम्यान, पीडितेच्या पतीने आपल्या मेहुण्याच्या भावालाही सोबत येण्यासाठी बोलावलं. दोघेही महिलेला दुचाकीवर घेऊन निघाले होते. मात्र भलुआही दरीजवळ पोहोचताच सहा जणांनी त्यांचे मोबाईल आणि दुचाकी हिसकावून तिघांनाही मारहाण केली. सुमारे चार तास आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं होतं. यानंतर आरोपींनी पीडितेच्या पतीला तिथेच सोडलं आणि नंतर महिलेसह अन्य व्यक्तीला दुचाकीवरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ लागले. दरम्यान, मनिका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साधवाडीह गावात कार पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून ग्रामस्थ जमा झाले. धरणात आढळले जोडप्याचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? कर्जतमधील धक्कादायक घटना, गावकऱ्यांनी आरोपींना पकडून बेदम मारहाण केली. दुसरीकडे, इतर आरोपीही महिलेच्या पतीला बांधून ठेवलेल्या ठिकाणाहून फरार झाले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन आरोपींना अटक केली. पीडितेच्या पतीने रात्री पोलीस ठाणं गाठून घडलेला प्रकार सांगितला. पीडितेची प्रकृती अत्यंत बिकट असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. रात्रीपासून ती खूप घाबरली आहे. सातबरवा पोलिसांनी या घटनेतील एक दुचाकी जप्त केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.