मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धरणात आढळले जोडप्याचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? कर्जतमधील धक्कादायक घटना,

धरणात आढळले जोडप्याचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? कर्जतमधील धक्कादायक घटना,

एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karjat, India
  • Published by:  sachin Salve

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

कर्जत, 25 सप्टेंबर : मुंबईपासून जवळ असलेल्या कर्जत तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोरबे धरणाच्या पात्रात एका जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहे. आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. आज सकाळी 10 ते 11 च्या सुमारास मोरबे धरणाच्या पात्रात एका जोडप्याचे मृतदेह स्थानिक रहिवाशी असलेल्या नागरिकांना आढळून आले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ खालापूर पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस परिसरात नेहमी मदत करणारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य घेऊन घटनास्थळी दाखल झाली. एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

(पुणे हादरलं! नवरा-बायकोचं भांडण पाहून ओरडली 8 वर्षांची मुलगी, पित्याचं भयानक...)

 यातील पुरुष अंदाजे 40 ते 45 आणि महिला 30 ते 35 वयोगटातील आहे. दोघेही नक्की नवरा बायको आहेत का की आणखी कुणी याबद्दल ओळख पटली नसून, त्याचे काम खालापूर पोलीस करत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ही आत्महत्या नसून खून असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे दाम्पत्य कोण आणि त्यांची नक्की हत्या झाली का आणि जर झाली असेल तर ती कोणत्या कारणाने झाली याचा तपास तात्काळ खालापूर पोलिसांनी सुरू केला असून याबाबत लवकरच खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

First published: