जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दारू पिऊन आला तरी बायकोकडे 50 रुपये मागितले, नकार दिल्यावर घडलं भयानक

दारू पिऊन आला तरी बायकोकडे 50 रुपये मागितले, नकार दिल्यावर घडलं भयानक

symbolic photo

symbolic photo

दारू पिऊन आला तरी नवऱ्याने बायकोकडे 50 रुपये मागितले. बायकोने नकार दिल्यावर भयानक घडलं.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 14 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडत आहेत. तसेच हत्या आणि आत्महत्येच्याही घटना घडत आहेत. यातच आता नाशिक जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी बायकोने 50 रुपये दिले नाही म्हणून रागाच्या भरात दारुड्या नवऱ्याने आपल्या बायकोची हत्या केली. लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून त्याने बायकोचा निर्घृण खून केला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी) येथे ही धक्कादायक घटना घडली. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मृत महिलेचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरामध्ये असलेली सांबरवाडी (गणेशवाडी) येथील लालू सोपान मोरे हा आपल्या बायको, मुलगा व सुन यांच्यासोबत राहतो. त्याचा मुलगा राकेश सोपान मोरे (वय-23) हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. काल रात्री आरोपी लालू सोपान मोरे हा दारू पिऊन घरी आला होता. बायको मीराबाई हिच्याकडे तो पुन्हा दारू पिण्यासाठी 50 रुपये मागत होता. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर तो घरातून निघून गेला. यानंतर सर्वांनी जेवण केले. त्यात मुलगा राकेश आणि सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले होते. तर आरोपीची पत्नी घरात एकटीच झोपी गेली होती. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आरोपी पती लालू सोपान मोरे हा घरी आल्यानंतर त्याने आतून दरवाजा लावून घेतला. हेही वाचा -  IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार प्रकरण, आणखी धक्कादायक माहिती समोर तसेच पैसे न दिल्याचा राग मनात धरून पत्नी मिराबाई लालू मोरे (वय-45) हिला मारहाण करू लागला. रागाच्या भरात त्याने मुसळ म्हणून वापर करीत असलेल्या लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यावेळी झालेला घोंगाट ऐकून मुलगा आणि सून दरवाजा वाजवू लागले. यानंतर लालू याने स्वतःच दरवाजा उघडला आणि तो आपल्या मुलाला म्हणाला की, मी तुझ्या आईला मारून टाकले आहे. तुला काय करायचे ते कर, असे फिर्यादी मुलाने म्हटले आहे. यानंतर राकेश याने वेळ न दवडता 108 नंबरला कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. पण रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मीराबाई हिला तपासले आणि मृत घोषित केले. याबाबत त्यांनी तत्काळ वाडीवऱ्हे पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दारुड्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात