जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Pune : पैशासाठी मैत्रीचे नाते विसरला, डोक्यात रॅाड टाकून जागेवरच संपवला

Pune : पैशासाठी मैत्रीचे नाते विसरला, डोक्यात रॅाड टाकून जागेवरच संपवला

Pune : पैशासाठी मैत्रीचे नाते विसरला, डोक्यात रॅाड टाकून जागेवरच संपवला

रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 जानेवारी, चंद्रकांत फुंदे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. पुण्याच्या आंबेगाव परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला असून, पोलीसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. राहुल दांगट असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सुशांत आरुडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. सुशांत हा राहुल दांगट यांची हत्या करून पसार झाला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोखंडी रॉडने मारहाण   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल मध्यरात्री राहुल दांगट यांचा आरोपी सुशांत आरुडे यांच्यासोबत पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपी सुशांत याने राहुल दांगट यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. रॉड डोक्याला लागल्यानं राहुल दांगट यांचा मृत्यू झाला. राहुल यांच्या मृत्यूनंतर आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हेही वाचा :  साई भक्तांवर काळाचा घाला; बस, ट्रकच्या भीषण अपघातात 10 ठार रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात