रोहतक, 25 जानेवारी : एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशीरा एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पत्नी आणि मुलाचा चाकूने गळा कापल्याचं समोर आलं आहे. तर पतीच्या मृतदेहाजवळ एक इंजेक्शन आणि दारूची बाटली आढळून आली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विनोद वय 35 वर्ष त्याची पत्नी सोनिया, सात वर्षांची मुलगी युविका आणि पाच वर्षांचा मुलगा अंश अशी मृतांची नावं आहेत.
भावाला धक्का
एकाच घरात चार मृतदेह आढळून आल्यानं हरियाणाच्या रोहतक शहरात खळबळ उडाली आहे. विनोदचा छोटा भाऊ विक्रम हा विनोदच्या घरी आला होता. त्याने बराचवेळ घराची बेल वाजवली मात्र कोणीच दरवाजा उघडला नाही. नंतर घराचा दरवाजा उघडाच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. जेव्हा तो घरात पोहोचला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याचा भाऊ, वहिनी आणि पुतण्यांचे मृतदेह त्याच्या समोर होते. त्याने याची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा : पाकिस्तानी अल्पवयीन मुलीला भारतात आणलं, मुलायमसिंग यादवला अटक!
पोलीस घटनास्थळी दाखल
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह हा बेडवर होता तर मुलीचा मृतदेह हा दुसऱ्या बेडवर होत्या तर विनोद याचा मृतदेह घरातील एका दुसऱ्या खोलीमध्ये आढळून आला आहे. विनोदच्या मृतदेहाजवळ एक इजेक्शन आणि दारूची बाटली आढळून आली आहे. पत्नी आणि मुलांचा चाकून गळा कापण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच पोलिसांना विनोदजवळ एक सुसाईड नोट देखील आढळून आली आहे. 'काही कारणांमुळे मी गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होतो, त्यामुळे हे पाऊल उचलल्याचं' या सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र कोणत्या गोष्टीचा ताण होता याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेला नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Police