मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पाकिस्तानी अल्पवयीन मुलीला भारतात आणलं, मुलायमसिंग यादवला अटक!

पाकिस्तानी अल्पवयीन मुलीला भारतात आणलं, मुलायमसिंग यादवला अटक!

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पाकिस्तानमधल्या अल्पवयीन मुलीला भारतात आणल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन ल्युडो गेम खेळताना या दोघांची ओळख झाली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Bangalore, India

मुंबई, 24 जानेवारी : महिला व मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या अनेक घटना घडतात. अनेक भारतीय स्त्रियांवर असे प्रसंग ओढवले आहेत. अशा काही घटनांमध्ये महिलांची तस्करीही केली जाते. अशाच एका घटनेत बेंगळुरू पोलिसांनी सोमवारी (23 जानेवारी) एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली. एका पाकिस्तानी तरुणीला अवैधरीत्या भारतात आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राहणारा मुलायमसिंह यादव हा सध्या बेंगळुरूत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तो पाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या संपर्कात आला, असं व्हाइटफिल्डचे पोलीस उपायुक्त एस. गिरीश यांनी सांगितलं. एका खासगी कंपनीमध्ये तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याला ऑनलाइन ल्युडो खेळण्याचं वेड आहे. त्या खेळातूनच त्याची ओळख पाकिस्तानातल्या मुलीशी झाली. गेल्या काही दिवसांत त्याने त्या मुलीला बेंगळुरूत येण्यास सांगितलं. त्या दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2022मध्ये त्यांनी नेपाळमार्गे भारतात येण्याचा प्लॅन आखला होता.

भारतात आल्यानंतर ते दोघंही बेल्लंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मजुरांच्या वस्तीत राहत होते. मुलायम सिंहला अटक केल्यावर आता त्या अल्पवयीन पाकिस्तानी मुलीला FRROकडे (Foreigners Regional Registration Office) सोपवण्यात आलंय. मुलायम सिंह याच्यावर खटला दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे विदेशी व्यक्ती अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत त्या जागेचे मालक गोविंदा रेड्डी यांच्यावरही एफआयआर नोंदवण्यात आलीय. त्या जागेमध्ये अनधिकृतरीत्या परदेशी नागरिक राहत असल्याबाबत पोलिसांना सूचना न दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. मुलायम सिंह याच्यावरही पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 420, 495, 468 आणि 471 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

ऑनलाइन गेमिंगचं वेड सध्या अनेक तरुणांना लागलंय. त्यापायी त्यांच्या आयुष्याचं नुकसानही होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अशा प्रकारे फसवणूक, चोरी व तस्करीच्या घटना घडताहेत. ऑनलाइन गेमिंगमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी किंवा ओळखीच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळ खेळता येतो. याचा फायदा अवैध धंदे करणारे घेतात व तरुणांना फसवतात. या माध्यमातून सायबर चोरीच्याही घटना घडतात. त्यासाठी सरकारनं काही कायदेही केले आहेत. इंटरनेटमुळे दिवसेंदिवस सायबर क्राइमच्या घटना वाढत आहेत. त्याचप्रमाणे महिला व मुलींची अवैध तस्करीही वाढते आहे.

First published: