जयपूर, 4 जुलै : गावातल्या एका टेकडीपाशी साध्या झोपडीवजा घरात राहणाऱ्या कष्टकरी महिलेचं (Poor woman) आय़ुष्य गावातील पाच गावगुंडांनी (Dabangs) अक्षरशः उद्धवस्त केलं. सत्तू देवी (Sattu Devi) नावाच्या या महिलेला तिच्या मूळ घरातून हुसकावून लावण्यासाठी या गुंडांनी त्रास दिला आणि त्यानंतर ती राहत असलेलं भाड्याचं घरही स्फोटकं (Explosives) लावून उडवून दिलं. आपल्या डोळ्यांदेखल आपल्या घराचा चक्काचूर होताना पाहून संतापलेली ही महिला जेव्हा पोलिसांकडे (Police) गेली, तेव्हा पोलिसही गुंडांना पाठिशी घालत असल्याचा अनुभव तिला आला.
राजस्थानातल्या भिलवाडा जिल्ह्यातील रायपूर परिसरात दगडं फोडून आपला चरितार्थ चालवणाऱ्या या महिलेवर झालेला अन्याय शेजाऱ्यांनीही पाहवला नाही. कैलाश नाथ, देवा नाथ, पारस गुर्जर, लेहरू नाथ आणि लक्ष्मण नाथ या गुंडांना अद्दल शिकवण्यासाठी त्यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फोन लावून घटनेची कल्पना दिली. मात्र प्रत्यक्षात पोलीस घटनास्थळी आलेच नाहीत. त्यानंतर या महिलेसह ग्रामस्थ पोलीस स्थानकात गेले, मात्र तिथं त्यांची कुणीच दखल घेतली नाही. गुन्हा सोडा, साधी तक्रारही नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. मात्र हट्टाला पेटलेल्या या महिलेनं हार न मानता आपला संघर्ष सुरूच ठेवला.
डीएसपींकडे दाद
स्थानिक पोलीस स्थानकातून प्रतिसाद मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर या महिलेनं थेट गंगापूर डीएसपींकडे धाव घेऊन फिर्याद सांगितली. त्यानंतर पोलीस दल हललं आणि कारवाईला किमान सुरुवात तरी झाली. घर उडवल्याच्या घटनेला 6 दिवस उलटून गेल्यानंतर स्थानिक रायपूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आणि तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकऱणातील चार गावगुंडांना पोलिसांनी बोलावून घेतलं.
हे वाचा -
बापानंच उद्धवस्त केला मुलीचा संसार; गोळीबारात चौघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी
तोंडदेखली कारवाई
या प्रकऱणी ‘वरून’ दबाव आल्यामुळे रायपूर पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. या गावगुंडांवर कुठलाही गंभीर गुन्हा दाखल न करता केवळ समज देऊन त्यांना सोडण्यात आल्याचं या महिलेनं सांगितलं. पोलिसांचा हा अजब न्याय पाहून ग्रामस्थही सुन्न झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.