मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बापानंच उद्धवस्त केला मुलीचा संसार; गोळीबारात चौघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी

बापानंच उद्धवस्त केला मुलीचा संसार; गोळीबारात चौघांचा मृत्यू तर दोघं गंभीर जखमी

(File Photo)

(File Photo)

एका भयंकर घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवेळी झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू (4 Killed in Firing) झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत.

चंदीगड 04 जुलै: एका भयंकर घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेवेळी झालेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू (4 Killed in Firing) झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना पंजाबच्या (Punjab Crime) गुरदासपुर येथे घडली आहे. या घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रेयसीला पळवलं एकानं अन् खून दुसऱ्याचा; 2 वर्षांनी तरुणाच्या हत्येचं गूढ उलगडलं

गुरदासपूर जिल्ह्यातील घुमन ठाण्याच्या छोटा बल्लाडवाल गावात रविवारी एका व्यक्तीनं एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळीबार केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इतर दोघंही यात गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला बटाला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती आणखीच बिघडल्यानं त्यांना अमृतसरच्या एका रुग्णालयात हलवण्यात आलं.

पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी; ठाण्यातील थरारक घटना

काय आहे प्रकरण -

एसएसपी बटाला, रशपाल सिंग यांनी म्हटलं, की मुख्य आरोपी सुखजिंदर सिंग आपल्या मुलीच्या सुखविंदर सिंग यांचा मुलगा हरमन सिंग याच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे (Relationship) नाराज होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक आठवड्याआधी हरमन सिंग सुखजिंदरच्या मुलीसोबत पळून गेला होता. या कारणामुळे तिचं कुटुंबीय नाराज होतं. याच कारणामुळे सुखजिंदर आपल्या भावासोबत रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सुखविंदर यांच्या शेतात गेला आणि कुटुंबातील सहा सदस्यांवर गोळीबार केला. यात चौघांचा मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी झाले. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुखजिंदर सिंग इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे आरोपी घटनेनंतर आपल्या दुचाकी घेऊन फरार झाले आहेत.

First published:

Tags: Crime news, Father, Murder news, Panjab, Shocking news