Home /News /crime /

पहिल्या पतीचे नातेवाईक जीवावर उठले, घरात घुसून चाकूने वार करून महिलेला संपवले

पहिल्या पतीचे नातेवाईक जीवावर उठले, घरात घुसून चाकूने वार करून महिलेला संपवले

पहिल्या पतीच्या नातेवाईकांसोबत मालमत्तेवरून वाद होता. याच वादातून महिलेची हत्या करण्यात आला.

जालना, 10 ऑगस्ट : संपत्तीच्या वादातून पहिल्या नवऱ्याच्या कुटुंबीयांनी एका विवाहितेला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजीपुरा परिसरात घडली. हिना सय्यद माजेद (30)असं या मयत विवाहितेचं नाव आहे. हिना हिचा दुसरे लग्न झालेले असून संपत्तीच्या वादातून रविवारी रात्री पहिल्या पतीसोबत वाद झाला होता. sushant Death Case : आत्महत्येच्या काही दिवसांआधी सुशांतने उचलला होता रियावर हात या वादातून अरबाज खान जफर खान, शाहबाज जफर खान, शेख अजगर शेख अब्दूल वहाब, अकबर धूम अली शाह, इस्माईल शाह व अन्य सहा महिलांनी फिर्यादी सय्यद माजिद सय्यद कय्यूम यांच्या काझीपुरा येथील घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी हिना यांना लोखंडी रॉड, काठी आणि चाकूने वार करुन जबर मारहाण केली. यात हिना सय्यद माजिद (30) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती फिर्यादी सय्यद माजिद हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तहसीलदाराच्या पतीकडूनच जीवाला धोका, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांकडे धाव या प्रकरणात मृत झालेल्या महिलेचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीपासून दूर झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत राहत होती. पहिल्या पतीच्या नातेवाईकांसोबत मालमत्तेवरून वाद होता. याच वादातून महिलेची हत्या करण्यात आला. याप्रकरणी सय्यद मजीद यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून 10 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या