Home /News /pune /

तहसीलदाराच्या पतीकडूनच जीवाला धोका, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांकडे धाव

तहसीलदाराच्या पतीकडूनच जीवाला धोका, राष्ट्रवादीच्या आमदाराची पोलिसांकडे धाव

तहसीलदार यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसीलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे.

पुणे,10 ऑगस्ट : जिल्ह्यातील खेडच्या तहसीलदार सुचित्रा बाळासाहेब आमले यांची बदली होणार आहे. परंतु, सदरची बदली होऊ नये यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची तहसीलदार समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून तसंच इतर विविध माध्यमांतून बदनामी सुरू केली आहे. तसंच तहसीलदार यांचे पती गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. तहसीलदार यांच्या बदलीवरून खेड तालुक्यात आमदार विरुद्ध तहसिलदार यांची लढाई आता विकोपाला गेला आहे. 'तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. मला पोलीस संरक्षण मिळावे', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलीस स्टेशनला समक्ष येऊन लेखी तक्रार केली आहे. संजय राऊतांचा दावा ठरला खोटा, सुशांतच्या मामाने केला मोठा खुलासा तहसीलदार सुचिता दामले यांचा एकूणच कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. खेडमध्ये बदलीसाठी झालेल्या लॉबिंगपासून ते भामा, भिमा, इंद्रायणी नदीत होत असलेले अवैद्य उत्खनन माजी आमदारांनी देखील तहसीलदार आणि त्यांच्या कार्यालयाच्या विरोधात तीन लक्षवेधी विधानसभेतील सभागृहात मांडल्या होत्या. गुळाणी येथील एका शेतकऱ्यांने तहसीलदारांच्या समोर त्यांच्या केबिनमध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणात देखील तहसीलदार या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अवैध उत्खनन मुरूम आणि वाळूचोरी याचे वाढते प्रमाण व त्यावर प्रशासनाचा नसलेला अंकुश हादेखील कळीचा मुद्दा ठरला होता. मोठी बातमी, राष्ट्रवादीचे 12आमदार भाजपच्या गळाला? NCPच्या मोठ्या नेत्याचा खुलासा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खेड येथील एका पक्षाचे कार्यक्रमात आलेले असताना तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर यांनी सुचित्रा आमले यांच्या बदलीची मागणी जाहीर स्टेजवर केली होती. परंतु, त्यावेळी अजित पवार यांनी या प्रश्नाला बगल देत सध्या सरकार बदल्यांच्या भानगडीत पडणार नसल्याचे सांगितले होते. एकूणच तहसीलदारांच्या बदलीचे राजकारण आता तहसील कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनपर्यंत येऊन पोहोचले आहे. आता हे बदली नाट्य अजून कुठल्या कुठल्या टप्प्यावर जाणार हे पुढील काळातच पहावे लागणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: राष्ट्रवादी

पुढील बातम्या