जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 'मी खेडचा दादा थांब संपवतोच तुला'; मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार

'मी खेडचा दादा थांब संपवतोच तुला'; मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार

'मी खेडचा दादा थांब संपवतोच तुला'; मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर गोळीबार

मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 22 जानेवारी : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहात्या घरासमोर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपी  मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.   घरासमोर गोळीबार   घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना राजगुरुनगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर घडली. समीर थिगळे हे त्यांच्या घरासमोर उभे असताना दोन जण आले त्यातील एकाने समीर थिगळे यांच्यावर बंदूक रोखून “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला” असे म्हणत पैशांची मागणी केली. यावेळी आरोपीकडून फायरिंग देखील करण्यात आली. या फायरिंगमध्ये थिगळे थोड्यक्यात बचावले आहेत. विशेष म्हणजे पुन्हा एकदा आरोपीकडून हवेत गोळीबार करत धमकी देण्यात आली. हेही वाचा : बायकोच्या ‘त्या’ निर्णयामुळे नवऱ्याला बसला धक्का; पोलीस ठाण्यातच उचललं टोकाचं पाऊल आरोपी फरार  दरम्यान या प्रकरणात आरोपी  मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राजगुरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे धमकी देणारे आरोपी हे हत्या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात