महोबा, 22 जानेवारी : पती, पत्नीमध्ये होणारे वाद ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक घरामध्ये कमी अधिक प्रमाणात पती, पत्नीमध्ये विविध कारणावरून वाद होतच असतात. मात्र उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पतीचा मृत्यू झाला आहे. आपल्या पतीसोबत भांडण केल्यानंतर पत्नी त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. पत्नीच्या पाठोपाठ पती देखील पोलीस ठाण्यामध्ये आला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यातच विषारी पदार्थ खाल्ला, ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली. पतीच्या नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात आयसीयू वार्डमध्ये भरती केलं, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत घोषीत केलं.
पतीला दारूचे व्यसन
ही घटना उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्यामधील श्रीनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिलखी गावातील आहे. बिलखी गावात राहणाऱ्या आशाचा आपला पती नरेश याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर ती त्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेव्हा तिच्या पाठिमागे तिचा पती नरेश देखील पोलीस ठाण्यात आला. नरेश जेव्हा पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा तो दारू पिलेला होता. त्याने आपल्या पत्नीला पोलिसांत तक्रार करताना पाहिले, आणि त्यानंतर त्याने विषारी पदार्थ खाल्ला. याची माहिती होताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.
विषारी पदार्थामुळे मृत्यू
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, काही कारणामुळे दिनेश आणि आशा यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर आशा आपल्या पतीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिच्या पाठोपाठ दिनेश देखील पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने आपल्या पत्नीला तक्रार देताना पाहिले आणि त्यानंतर त्याने विषारी पदार्थ खाल्ला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime