Home /News /crime /

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची मोठी फसवणूक; घातला 10 लाखाचा गंडा

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची मोठी फसवणूक; घातला 10 लाखाचा गंडा

विनायक पाटील याने आपल्याकडे मोठा इन्वेस्टर असून आपल्याला लागणारे लोन उपलब्ध करून देईल, असं सांगितलं. यानंतर विनायक पाटील याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी आपली ओळख असल्याचं सांगून आपणास लोन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं.

पुढे वाचा ...
    मुंबई 18 जून : सुजाता राकेश चंद्र या पुण्यातील महिलेला विज्ञान विद्या लिमिटेड कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी एका मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता होती. याकरता त्यांनी अनेक इन्वेस्टरकडून लोन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वर्षापासून कोणीच लोन देण्यास तयार नव्हतं. यासंदर्भात महिलेनं ओळखीचे असलेले अशोक जाधव यांच्यासोबत चर्चा केली असता जाधव याने थोड्याच दिवसांनी फोन करून एक इन्वस्टर असल्याचं सांगितलं. नंतर जाधव यांनी विनायक शंकरराव पाटील यांच्याशी वरील महिलेची ओळख करून दिली. विनायक पाटील याने आपल्याकडे मोठा इन्वेस्टर असून आपल्याला लागणारे लोन उपलब्ध करून देईल, असं सांगितलं. यानंतर विनायक पाटील याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी आपली ओळख असल्याचं सांगून आपणास लोन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं. मात्र लोन उपलब्ध करून देताना आपल्याला कमिशन द्यावे लागेल आणि ते अडीच लाख रुपयांचे असेल असंही त्याने सांगितलं. महिलेनं अडीच लाख रूपये दिले (Financial Fraud). 11 वर्षांच्या प्रेमाखातर सॉफ्टवेअर इंजिनियरने मृत्यूला कवटाळलं; प्रेयसी हादरली, कुटुंबावर शोककळा! काही दिवसांनी वरील व्यक्तीने कागदपत्रात त्रुटी असून लोन मंजूर होणार नसल्याचं सांगितलं. यानंतर आपणास काही तारण ठेवावं लागेल, असं तो म्हणाला. मात्र महिलेने आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं तारण नसल्याने आता तुम्हीच यावर काहीतरी तोडगा काढावा, असं म्हटलं. विनायक पाटील यांनी महिलेला म्हटलं की आपल्या एका एनजीओकडे साठ एकर जमीन आहे. त्या संबंधित जमिनीवर आपल्याला लोन उपलब्ध होणार असल्याचं महिलेलं सांगितलं . स्वतःच्या GF चा हात पकडणंही तरुणाला पडलं महागात; 8 वर्षांनंतरही मुंबईतील कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा परंतु सदर जमिनीवर लोन उपलब्ध करून देताना आपल्याला त्यावरील कमिशन द्यावं लागेल असंही पाटील यांनी म्हटलं. महिलेकडे कोणताही पर्याय नसल्याने ती त्यावरीही तयार झाली. आपली लोनची फाईल राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांच्याकडे मंजुरीसाठी गेली असून त्यांच्या पीएला कमिशन द्यावे लागेल म्हणून सतेज उर्फ बंटी डी पाटील यांचा पीए असल्याचं भासवून भोसले नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला फोनवर संपर्क केला. मी मंत्र्याचे पीए असून तुमची फाईल मंजूर झाली आहे मात्र त्याकरिता आपणास पैसे द्यावे लागतील असं त्याने म्हटलं. यानंतर महिलेनं अजून अडीच लाख आणि इतर खर्च असं एकूण दहा लाख पाच हजार रुपयांचं कमिशन संबंधित व्यक्तीला दिलं. मात्र लोन उपलब्ध होत नसल्याने संशय आल्यावर विनायक पाटील या व्यक्तीच्या दिलेल्या पत्त्यावर महिलेनं संपर्क केला असता, तो पत्ता खोटा निघाला आणि त्याचं मूळ नाव विनायक रामगुडे असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर महिलेनं संबंधित व्यक्तीवर 34 आणि 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कामोठे पोलीस करीत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Financial fraud

    पुढील बातम्या