बंगळुरू, 17 जून : हैद्राबादमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेमाखातर (A software engineer committed suicide by jumping under a speeding train) ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी एन. रमेश (26) नावाच्या तरुणाने सिम्हापूरी एक्सप्रेसखाली येऊन आत्महत्या केली. खिशातील ओळखपत्रातून मृतदेहाची ओळख पटली.
हैद्राबाद (Hyderabad News) येथील एका फर्ममध्ये रमेश सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होता. तो एका तरुणीसोबत गेल्या 11 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही शाळा, कॉलेजपासून एकाच वर्गात शिकत होते. त्यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्या कारणाने दोघांचेही कुटुंबीय या लग्नास तयार नव्हते.
प्रेमात हाती निराशा पडल्यामुळे रमेश तणावात होता. यातूनच त्याने मोठं पाऊल उचललं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. देशात अद्यापही जाती-पातीवरुन लग्नास नकार दिला जात आहे. आजही प्रेमापेक्षा जातीला अधिक महत्त्व दिलं जात आहे. कुटुंबाच्या याच हट्टापायी एका 26 वर्षांच्या होतकरू मुलाला आपला जीव गमवावा लागला. ही बाब त्याच्या प्रेयसीसाठी तर धक्का देणारीच असेल. दोन्ही कुटुंबाने हे लग्न मान्य केलं असतं तर दोघांचा सुखी संसार झाला असता. मात्र आता परिस्थितीत हाताबाहेर निघून गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Hyderabad, Love, Suicide