नर्मदापुरम (मध्य प्रदेश), 3 जुलै : मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम येथे एक भयानक घटना घडली आहे. नर्मदापूर येथील एका गावातून गायींच्या तस्करीच्या हेतून एक ट्रक महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येणार होता. विशेष म्हणजे जवळपास दोन डझनपेक्षा जास्त गायी या ट्रकमध्ये भरण्यातही आल्या होत्या. या गायींना अमरावती आणि नागपुरात आणलं जाणार होतं. पण त्याआधीच नर्मदापूरमधीलच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना गायींची तस्करी केली जाणार आहे, गायींना कत्तलखान्यात घेवून जाणार आहेत, अशी खबर पसरली. त्यानंतर जमावाने रात्रीच्या सुमारास जाणाऱ्या गायींच्या ट्रकला अडवलं. ट्रकमध्ये खरंच गायी पाहून काहीजण संतापले. त्यांनी गाडीत असलेल्या तिघांना प्रचंड मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने त्या तिघांना इतकी मारहाण केली की त्यापैकी एक जणाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित घटनेची माहिती समोर आली तेव्हा गायींच्या तस्करीच्या मुद्द्यावरुन प्रचंड मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जमावाने गायींच्या तस्करी करणाऱ्या तीन जणांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. संबंधित माहिती ही खरी ठरली आहे. कारण जमावाने मारहाण केलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ( तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल) संबंधित घटना ही सिवनीमालवा येथील बराखड गावाजवळ घडली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि गायींच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ट्रक चालकाने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी आपल्यासोबत नेमकं काय घडलं ते त्याने सविस्तर सांगितलं. पण ट्रक चालकाने गायींच्या तस्करीसाठी आपण गायी घेवून जात होतो असं विधान केलेलं नाही. गायींना अमरावतीत बाजारात घेवून जात होतो, असं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.