मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोशल मीडियावर प्रेम, नंतर धोका, अल्पवयीन मुलीची तीनवेळा विक्री; कशी फुटली अत्याचाराला वाचा

सोशल मीडियावर प्रेम, नंतर धोका, अल्पवयीन मुलीची तीनवेळा विक्री; कशी फुटली अत्याचाराला वाचा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

हे प्रकरण पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे. येथे 15 वर्षीय तरुणी तिच्या प्रियकरासह पळून गेली. पण प्रियकराने तिला विकले. त्यानंतर चार महिन्यांत तीनदा विक्री झाली. या प्रकरणात न्यायालयाने 6 दोषींना शिक्षा सुनावली आहे.

पुढे वाचा ...

कोलकाता, 1 ऑगस्ट : अजाणत्या वयात प्रेमाचं आकर्षण निर्माण झाल्यामुळे घरातून पळून गेलेल्या अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मुलींना फसवणारे, त्यांचा बाजार मांडणारे या गोष्टीचा फायदा घेतात. समाजात अजूनही याबद्दल अज्ञान आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलींना फसवणाऱ्यांच्या हातात आयतं हत्यार सापडल्यासारखं झालं आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal Girl Raped Many Times) नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर करून 15 वर्षीय मुलीला फसवून तिला विकण्याची घटना घडली होती. नुकतीच न्यायालयानं या खटल्यातील 6 आरोपींना शिक्षा सुनावली आहे. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

वृत्त एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यातील एका मुलीची सात वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे (Social Media) एका मुलासोबत ओळख झाली. हळूहळू त्यांचं प्रेम जमलं. एकेदिवशी मुलगी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. 7 जानेवारी 2015 ला कोलकात्यातील सायन्स सिटीजवळ ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटली. तिथून ते बाबूघाट इथे गेले. तिथून त्यांनी बिहारला जाण्यासाठी बस पकडली. आरोपी राहुल लगेच परत येतो असं सांगून बसमधून उतरला. मात्र, तो परत आलाच नाही. उलट दीड लाख रुपयांमध्ये त्यानं त्या मुलीला विकलं होतं. त्यानंतर बसमध्ये राहुलचा मित्र असल्याचं सांगत एका व्यक्तीनं त्या मुलीला हावडा स्टेशनवर नेलं. तिथून ते रेल्वेनं बिहारला पोहोचले. बिहारमध्ये कमल नावाच्या व्यक्तीला त्या मुलीला विकण्यात आलं. कमलनं तिला उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) बिजनौरमध्ये राहणाऱ्या चित्रा नावाच्या महिलेकडे नेलं. चित्रानं तिला खरेदी करून स्वतःच्या 45 वर्षांच्या भावाशी तिचं लग्न लावून दिलं. महिन्याभरानं त्या इसमानं मुलीला चित्राच्या घरी सोडलं. त्यानंतर चित्राच्या मुलानं त्या मुलीवर बलात्कार करायला सुरुवात केली.

Shocking! 11 व्या मजल्यावरुन महिलेने मारली उडी; शेजारच्या खोलीत होतं कुटुंबीय 

चित्राच्या घरी असताना मुलीला एकदा स्वतःचा मोबाईल मिळाला. तेव्हा तिनं आईला फोन करून आपण कुठे आहोत, याची माहिती दिली. पश्चिम बंगाल पोलिसांना मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून मुलगी बिहारमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो मोबाईल बंद होता. पोलिसांनी छापा टाकून राहुलला अटक केली. चित्राला याची माहिती मिळताच तिनं कमलला मुलीला घेऊन जायला सांगितलं. तो व त्याचा साथीदार मुलीला उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) काशीपूरमध्ये घेऊन गेले. चित्रा व तिच्या मुलाला अटक झाल्याचं कळताच ते दोघं मुलीला स्टेशनवर सोडून पळून गेले.

या सगळ्या घटनेमुळे मुलीला मानसिक धक्का बसला होता. ती काही बोलू शकत नव्हती. जवळपास महिनाभर ती काहीच सांगू शकली नाही. तिचं समुपदेश केल्यावर आता ती नॉर्मल झाली आहे, असं सीआयडी (CID) अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या घटनेत सीआयडीनं 6 आरोपींना अटक केली आहे. त्यात एक महिलासुद्धा आहे. तसंच मुलीचा बॉयफ्रेंड राहुलदेखील आहे. बिहार, यूपी आणि उत्तराखंड अशा वेगवेगळ्या ठिकाणांमधून त्यांना पकडण्यात आलं. पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील पॉक्सो (POCSO) न्यायालयानं यातील चार आरोपींना 20 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे, तर इतर दोन आरोपींना 10 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. आता मुलीचं वय 22 वर्षं आहे. ती नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिचे वडील साडीच्या दुकानात काम करतात. मुलगी त्यांच्याकडे परत आली आहे. दोषींना शिक्षाही झाली आहे. आता नव्यानं आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सोशल मीडियावरून ओळख, मग मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलानं त्या 15 वर्षांच्या मुलीला फसवलं. त्यानंतर चार महिन्यांत तीन वेळा तिला विकण्यात आलं. इतकं झाल्यानंतर अखेर आरोपींना पकडून त्यांना शिक्षा देण्यात पोलिसांना यश आलं आहे.

First published:

Tags: Crime, West bengal