मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काय होणार पर्यावरणाचं? कोकणातील जगबुडी नदीत प्रदूषणानं 2 मगरींचा अंत

काय होणार पर्यावरणाचं? कोकणातील जगबुडी नदीत प्रदूषणानं 2 मगरींचा अंत

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी, 27 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी जगबुडी नदी प्रदूषणाच्या विळख्यात एकाच दिवशी दोन मगरींचा या नदीत मृत्यू झाला आहे. तसेच मागील तीन महिन्यात एकूण सहा मगरींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या नदीमध्ये असणाऱ्या महाकाय मगरींचा एकापाठोपाठ एक मृत्यू होऊ लागला आहे. काल 26 जानेवारी रोजी याच जगबुडी नदीमध्ये भोस्ते आणि सुसेरी या दोन ठिकाणी दोन विविध ठिकाणी दोन महाकाय मगरी मरुन नदीपात्राबाहेर तरंगत असताना आढळल्या आहेत. सध्या जगबुडी नदीला नाल्याचे स्वरूप मिळाले आहे. या नदीतील मगरीच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्याच आठवड्यात जगबुडी नदी पात्रातील मटन मच्छी मार्केट शेजारी अशाच प्रकारे एक मगर मृता अवस्थेत आढळून आली. तर काल जगबुडी नदीमधील भोस्ते पूल तसेच सुसेरी गावानजीक अशा प्रकारे एकाच दिवशी दोन मगरींचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. झोपडी नदीमधील वाढते प्रदूषण ही जलचरांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

हेही वाचा - नांदेडमधील संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी NIA च्या पथकाला मोठे यश

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये सहा मगरींचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. काही मगरींना नदीच्या पात्रात जाळून त्यांच्यावर अंत्य विधी करण्यात आला. तर काही शवविच्छेदन करून पुण्यात आणल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मगरींच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Death, Ratnagiri