मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शेत दाखवण्यासाठी घेऊन जात बापानंच चिरला मुलीचा गळा; निर्घृण हत्या पाहून आईही जागीच कोसळली

शेत दाखवण्यासाठी घेऊन जात बापानंच चिरला मुलीचा गळा; निर्घृण हत्या पाहून आईही जागीच कोसळली

घटनेत बापानं आपल्या मुलीची गळा चिरून हत्या केली (Father Killed Daughter). या घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला.

घटनेत बापानं आपल्या मुलीची गळा चिरून हत्या केली (Father Killed Daughter). या घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला.

घटनेत बापानं आपल्या मुलीची गळा चिरून हत्या केली (Father Killed Daughter). या घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला.

रांची 23 जुलै: एका बापानंच आपल्या विवाहित मुलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी विवाहित मुलगी आणि पत्नी यांना जमीन दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. इथेच त्यानं आपल्या मुलीची गळा चिरून हत्या केली (Father Killed Daughter). या घटनेनंतर आरोपी बाप फरार झाला. खुशबूसोबत घडलेला हा प्रकार पाहून तिची आई बेशुद्ध झाली. ही घटना झारखंडच्या (Jharkhand) धनबाद येथील नावाटांड येथे घडली. आसपासच्या लोकांनी गोविंदपूर पोलिसांत घटनेची माहिती दिली.

6 महिन्यांपासून मुलीवर बलात्कार करत होता बाप; 10 वर्षीय भावानं केली सुटका

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत महिलेच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. आरोपी वडील राजकुमार साव झरिया येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपली पत्नी आणि मुलीला गोविंदपूरच्या नावाटांड येथील जमीन दाखवण्यासाठी घरातून बाहेर घेऊन आला.

तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला;भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

आरोपी राजकुमार साव यानं संधी शोधून आपल्या मुलीची हत्या केली आणि तो फरार झाला. आपल्या परवानशिवाय खुशबूनं लव्ह मॅरेज केल्यानं राजकुमारनं ही हत्या केल्याचं समोर येत आहे. 9 महिन्यांआधीच खुशबूनं घरच्यांच्या विरोधात जाऊन एका मुलासोबत लग्न केलं होतं. याच गोष्टीमुळे तिचे वडील नाराज होते. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. आपल्या मुलीची हत्या स्वतःच्या डोळ्यासमोर होताना पाहणाऱ्या आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Crime news, Daughter, Father, Father run away, Murder news