जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मालेगावातील चौघांनी गमावले प्राण

तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मालेगावातील चौघांनी गमावले प्राण

तिरुपतीला दर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मालेगावातील चौघांनी गमावले प्राण

Road Accident: तिरुपती बालाजीला दर्शनासाठी (Tirupati Balaji Visit) जाणाऱ्या काही भाविकांवर वाटेतच काळानं घाला घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उस्मानाबाद, 23 जुलै: तिरुपती बालाजीला दर्शनासाठी (Tirupati Balaji Visit) जाणाऱ्या काही भाविकांवर वाटेतच काळानं घाला घातला आहे. सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरून तिरुपतीच्या दिशेनं जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला एका आयसर टेम्पोनं भीषण धडक (accident) दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू (4 death) झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी (3 Injured) झाले आहेत. मृत झालेले चारही जण नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील तेरखेडा गावच्या परिसरात घडला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला, पाठीमागून आलेल्या आयसरने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत तिरुपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मयत चारही जण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. या भीषण अपघातात अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा- तरुणाच्या हत्येप्रकरणी भाजप नेत्याला 26 वर्षांनंतर जन्मठेप नेमका अपघात कसा घडला? खरंतर, तिरुपतीला दर्शनासाठी जाणारे भाविक ज्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्यून प्रवास करत होते. तो टेम्पो ट्रॅव्हलर पंक्चर झाला होता. त्यामुळे तेरखेडा येथील माऊली हॉटेलजवळ टेम्पो उभा करण्यात आला होता. यावेळी काहीजण गाडीतच बसले होते. दरम्यान याच मार्गानं उस्मानाबादकडे जाणाऱ्या आयसरने या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो ट्रॅव्हरलाचा चुराडा झाला आहे. हेही वाचा- गोड बोलून साडी नेसायला देत महिलेसोबत संतापजनक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात