मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /निर्दय! बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार, आईवडिलांच्या भांडणात लेकीचा बळी

निर्दय! बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार, आईवडिलांच्या भांडणात लेकीचा बळी

आईवडिलांच्या भांडणात निष्पाण मुलीचा जीव (Father killed 6 month old daughter after fight with wife) गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

आईवडिलांच्या भांडणात निष्पाण मुलीचा जीव (Father killed 6 month old daughter after fight with wife) गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

आईवडिलांच्या भांडणात निष्पाण मुलीचा जीव (Father killed 6 month old daughter after fight with wife) गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

जयपूर, 29 सप्टेंबर : आईवडिलांच्या भांडणात निष्पाण मुलीचा जीव (Father killed 6 month old daughter after fight with wife) गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आईवडिलांच्या कडाक्याच्या भांडणात सख्ख्या बापानेच रस्त्यावर आपटून (Father slammed 6 month old girl) चिमुकलीचा जीव घेतला. रागाच्या भरात पत्नीला धडा शिकवण्यासाठी बापाने आपल्या 6 महिन्यांच्या लेकीला (Death of 6 month old girl) रस्त्यावर इतक्या जोरात आपटलं की तिचा या घटनेत मृत्यू झाला.

भांडणात केला चिमुकलीचा बळी

राजस्थानमधील बारां जिल्ह्यात नवरा आणि बायकोच्या भांडणात सहा महिन्यांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. पवन आणि सीमा या जोडप्याला आरुषी नावाची 6 महिन्यांची मुलगी होती. या पती-पत्नीत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर पवननं सीमाच्या कुशीतून मुलीला हिसकावून घेतलं होतं. मुलगी आपल्याकडेच राहिल, असं सांगत त्याने सीमाला घरातून हाकलून दिलं.

मुलीला आपटल्याने मृत्यू

आदल्या दिवशी माहेरी राहिलेली सीमा दुसऱ्या दिवशी पुन्हा बाळाला घेण्यासाठी सासरी आली. त्यावेळी पुन्हा एकदा पवन आणि सीमामध्ये कडाक्याचं भांडण सुरु झालं. पवनने रागाच्या भरात सीमाच्या कुशीतून मुलीला उचललं आणि तिला जोरात जमिनीवर आपटलं.

हे वाचा - पाकिस्तान धोकेबाज, भारतानं थेट आमच्याशी बोलावं; तालिबानचं आवाहन

घटनेत मुलीचा मृत्यू

पवनने सहा महिन्यांच्या आरुषीला इतक्या जोरात जमिनीवर आपटलं की त्यात तिच्या डोक्याची हाडं मोडली. रक्तस्त्राव होऊन बिचाऱ्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने विव्हळ झालेल्या सीमाने आकांडतांडव केल्यानंतर कुणीतरी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. आपल्या लेकीचा खून केल्याचा गुन्हा पवनवर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लेकीच्या मृत्यूमुळे सीमावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Murder, Rajasthan