काबुल, 29 सप्टेंबर : तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील मधूर (Relation between Taliban and Pakistan) संबंध कडवट होऊ लागल्याचं चित्र दिसायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा देश नसून (Don't believe Pakistan and talk to us, Taliban appeals to India) भारतानं थेट आमच्यासोबत चर्चा करावी, असं आवाहन तालिबानच्या ज्येष्ठ नेत्यानं केलं आहे. आम्ही सुपरपॉवर असणाऱ्या अमेरिकेसमोरही झुकलो नाही, त्यामुळे पाकिस्तानसमोर झुकण्याचा (Taliban will not listen to Pakistan) प्रश्नच नसल्याचं तालिबानचे संस्थापक नेते मुल्ला अब्दुल सलाम जईफ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानवर विश्वास नाही
अफगाणिस्तानच्या भूमीचा भारताविरोधात वापर होईल, अशी भीती भारताला वाटत असेल, तर भारताने थेट तालिबान सरकारसोबत चर्चा सुरु करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. पाकिस्तानच नव्हे, तर इतर कुठल्याही देशाला आम्ही आमच्या भूमीचा इतर कारवायांसाठी वापर करू देण्याचा प्रश्नच उद्भवत नसून भारताने त्यासाठी आमच्याशी बोलणी सुरु करायला हवीत, असं आवाहन जईफ यांनी केलं आहे.
म्हणे तालिबान सुधारला
तालिबानने आधुनिक काळानुरुप आपल्या वर्तनात आणि धोरणात बदल केले असून महिलांच्या शिक्षणाचा आणि कामाचा मार्ग मोकळा केल्याचा दावा जईफ यांनी केला आहे. मुली शाळेत जात आहेत, महिला कामावर जात आहेत, अनेक महिला अधिकारांसाठी खुलेपणानं आवाज उठवत आहेत. त्यांना राजकारण, व्यापार, शिक्षण यासारख्या क्षेत्रात संधी दिली जात असल्याचा दावा तालिबाननं केला आहे.
हे वाचा - ते एक विधान भोवलं; पाकिस्तानात मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा, काय आहे प्रकरण?
जगाच्या मान्यतेची प्रतीक्षा
तालिबानचं हे अंतरिम सरकार असून नव्या सरकारमध्ये महिलांना स्थान देण्याबाबत गांभिर्यानं विचार सुरू असल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी तालिबानला साथ दिली, त्या सर्वांना सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे सर्व होण्यासाठी भारतानं अगोदर तालिबान सरकारला अधिकृतरित्या मान्यता द्यावी आणि मग समोरासमोर चर्चा करावी, असं आवाहन जईफ यांनी केलं आहे. पाश्चिमात्य देशांनाही त्यांनी तालिबान सरकारला मान्यता देण्याची विनंती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, India, Pakisatan, Taliban