लखनऊ 22 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या तक्रारीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गाझियाबाद पोलिसांचं म्हणणं आहे की, महिलेच्या बलात्काराच्या तक्रारीचे प्रकरण कटाचा भाग आहे आणि त्यामागे 53 लाख रुपयांच्या मालमत्तेचा वाद आहे. मालमत्ता बळकावण्याच्या प्रयत्नात पाच जणांवर सामूहिक बलात्कार आरोप केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, सामूहिक बलात्कार आणि मारहाणीचा आरोप करणारी महिला खोटं बोलत होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी बुधवारी सांगितलं की, ३६ वर्षीय महिला एका गोणीत बंद अवस्थेत सापडली होती आणि तिचे हातपाय बांधलेले आढळले होते. महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातल्याचाही आरोप करण्यात आला होता. यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान वेगळीच गोष्ट समोर आली. मटण ठरलं त्याच्या मृत्यूचं कारण, बायको-नवरा भांड-भांड भांडले, पण… गाझियाबाद पोलिसांनी महिलेचा दावा फेटाळून लावला आहे , ज्यात तिने म्हटलं होतं की तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. हे पूर्णपणे “बनावट” असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दावा केला की संपत्ती हडपण्यासाठी हे संपूर्ण ‘षडयंत्र’ रचला गेलं होतं. संपत्तीवरुन महिला आणि तिने आरोप केलेल्या व्यक्तींमध्ये वाद झाला होता. राष्ट्रीय महिला आयोगानेही म्हटलं की महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या विधानांमध्ये विरोधाभास आढळला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर, महिलेच्या भावाने दावा केला होता की, 16 ऑक्टोबर रोजी त्याची बहीण त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहून दिल्लीला परतत असताना पाच जणांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर 18 ऑक्टोबरच्या पहाटे ती गाझियाबादमध्ये सापडली. पोलिसांनी सांगितलं होतं की त्यांना ती महिला एका गोणीत सापडली होती, परंतु तिच्या शरीराचा वरचा अर्धा भाग बाहेर होता आणि ती बोलत होती. नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल त्यानंतर तिला GTB हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे तिला कोणतीही अंतर्गत दुखापत झाली नसल्याचे आढळले, असं सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती तपासकर्त्यांनी दिली नाही. सध्या ही महिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिला ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलिसांनी सांगितलं की, महिलेनं ज्या पाच जणांना आरोपी बनवलं आहे, त्या त्यांच्यासोबत महिलेचा मालमत्तेवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सांगितलं होतं की, महिलेच्या आरोपानंतर पाचपैकी चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. गुरुवारी या चौघांना ‘क्लीन चिट’ दिली जाईल का, असे विचारले असता मेरठचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार म्हणाले, “आम्हाला त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. प्रथमदर्शनी, या प्रकरणात अशी कोणतीही घटना घडली नाही.” . त्यामुळे पुरावे मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.