Home /News /crime /

वर्षभर फेसबुकवर रंगली प्यारवाली लव्हस्टोरी, जातीमुळे लग्नास नकार देणे तरुणाला पडले भारी

वर्षभर फेसबुकवर रंगली प्यारवाली लव्हस्टोरी, जातीमुळे लग्नास नकार देणे तरुणाला पडले भारी

फेसबुकवर (Facebook) दोघांची मैत्री होते आणि काही दिवसांनी याचे रुपांतर प्रेमात होते. पण मुलगी 17 वर्षांची असल्यामुळे लग्न करता आले नाही.

    उस्मानाबाद, 02 डिसेंबर :  फेसबुकवर (Facebook) दोघांची मैत्री होते आणि काही दिवसांनी याचे रुपांतर प्रेमात होते. पण मुलगी 17 वर्षांची असल्यामुळे लग्न करता आले नाही. त्यामुळे लग्नाचे वय झाल्यावर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नाची वेळ आली असता  जातीचे कारण देऊन मुलाने लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीसोबत ही घटना घडली आहे. 17 वर्ष वय असताना  मुलीची एका 18 वर्षीय तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले.  आरोपी तरुणाने मुलीला वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचे वचन दिले. या काळात दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. दोघेही जण एकमेकांशी  चॅटिंग करत असत. मध्यंतरीच्या काळात व्हिडीओ कॉलकरून एकमेकांशी बोलत होते. खडीने भरलेला ट्रक कारवर उलटून भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू नोव्हेंबर महिन्यात मुलगी 18 वर्षांची झाली. त्यामुळे तरुणाने दिलेल्या वचनाची आठवण करून देत पीडित तरुणीने लग्नासाठी विचारणा केली. तिने वारंवार त्याला फोन केला पण या तरुणाने लग्न करण्यास  टाळाटाळ केली. पण, मुलीने पुन्हा एकदा तरुणाला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने आपल्या दोघांच्या जाती या वेगळ्या आहे. त्यामुळे आई वडिलांचा आपल्या लग्नाला विरोध आहे, असं सांगून नकार दिला. कमाईचा हिट फॉर्म्यूला! 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकारही करेल मदत तरुणीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याने सर्व संबंध तुटले असं सांगत फोन बंद केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या तरुणाने आपल्यासोबत फोनवर अश्लिल चॅट केली आणि फसवणूक केली, अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात भादवी कलम 354 सह पोक्सो कायदा कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणाला अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या