Home /News /national /

खडीने भरलेला ट्रक कारवर उलटून भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

खडीने भरलेला ट्रक कारवर उलटून भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू

ट्रकचा टायर फुटल्यामुळे खडीनं भरलेला ट्रक या कारवर उलटला आणि अपघात झाला अशी माहिती मिळाली आहे.

    कौशांबी, 02 डिसेंबर: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर ट्रक उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. खडीने भरलेला ट्रक उलटल्यानं भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही लोक ट्रकखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रकला हटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी इथे हा भीषण अपघात झाला आहे. मृतांमध्ये महिला, मुलं आणि पुरुषांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व लोक एकाच कुटुंबातली आहेत. एक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपवून घरी जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यात आला असून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. हे वाचा-‘निवार’नंतर आठवडाभरातच तामिळनाडूत दुसरं चक्रीवादळ धडकणार, मुसळधार पावसाची शक्यता ट्रकचा टायर फुटल्यामुळे खडीनं भरलेला ट्रक या कारवर उलटला आणि अपघात झाला अशी माहिती मिळाली आहे. घटनास्थळी उपस्थित डीएम अमित सिंग यांनी आठ जणांच्या मृत्यूची नोंद केली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानुसार ट्रकचे टायर फुटला. ट्रकमध्ये खडी भरलेली होती आणि हा ट्रक कारवर उलटला. ट्रकच्या वजनामुळे कार चालक बाहेर येऊ शकले नाहीत. डीएम यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या