जबलपूर, 26 जुलै : असं म्हणतात, प्रेमात जर मर्यादा ओलांडली तर व्यक्ती काहीही करू शकतो. आणि जर त्याच प्रेमात तिला धोका मिळाला तर ती व्यक्ती कोणाचा जीवही घेऊ शकते. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील आहे. येथे एका विवाहित व्यक्तीने आपल्याला धोका दिलेल्या Ex प्रेयसीची गोळी मारून हत्या केली आणि स्वत:ही नदीत उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात घडलेला प्रकार समोर आला. ही खळबळजनक घटना जबलपूरमधील पोलीस चौकीतील आहे. येथे नर्मदा पुलावर 23 जुलै रोजी जोगनी नगर रामपूर निवासी अनिभा केवट हिचा मृतदेह एका कारमध्ये होता. अनिभची हत्या गोळी झाडून करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्याच्या तीन दिवसानंतर पटेलचा मृतदेहही तिलवारा पुलाजवळ आढळला. मृत बादल पटेल व्यवसायाने प्रत्रकार आहे. पोलिसांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी खोट्या पत्रकार गँगवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर पटेलला देखील अटक करण्यात आली होती आणि त्याला तुरुंगात पाठवलं होतं. दुसरीकडे त्याची प्रेयसी अनिभाचं मनी ट्रान्जेक्शन कंपनीच्या मॅनेजरसोबत अफेअर सुरू होतं. जेव्हा बादल पटेल तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला आपल्या प्रेयसीबद्दल कळालं, यानंतर त्याला संताप झाला. यानंतर त्याने आपल्या प्रेयसीला समजावण्यासाठी अनिभाला तिच्या आयटी पार्कस्थित ऑफिसच्या बाहेर बोलावलं आणि तिला आपल्या मित्राच्या कारमध्ये बसवून नर्मदा पुलावर घेऊन गेला. येथे दोघांमध्ये भांडण झालं आणि बादल पटेलने अनिभाला गोळी घातली. यात तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याने अनिभाचा मृतदेह कारमध्येच ठेवला आणि स्वत: नर्मदा नदीत उडी मारली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.