नवी दिल्ली, 23 जुलै : देशात सातत्याने बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यातच आता दिल्लीतून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या एका खोलीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटली. ही घटना 21 तारखेच्या रात्री घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - या प्रकरणातील सर्व आरोपी रेल्वेच्या विद्युत विभागात कर्मचारी आहेत. पीडित महिलेने आरोप केला आहे की, रेल्वे स्टेशनवर 2 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला, तर 2 कर्मचारी बाहेर पहारा देत होते. या संदर्भात रेल्वे पोलिसांना पीसीआर कॉल आला होता. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला फरिदाबादची रहिवासी असून तिचे वय 30 वर्षे आहे. गेल्या 1 वर्षापासून ती पतीपासून वेगळी राहत आहे. तसेच तिचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्याने तिला नोकरीचे आश्वासन दिले होते. तसेच त्यानंतर तिने रेल्वे कर्मचाऱ्याशी फोनवर बोलणे सुरू केले होते. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 21 तारखेच्या रात्री आरोपीने तिला फोनवर बोलावून घेतले. आरोपीने तिला सांगितले होते की, आज त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याने घरात एक छोटी पार्टी ठेवली आहे. यानंतर पीडित महिला रात्री साडेदहाच्या सुमारास कीर्ती नगरमध्ये पोहोचली. तेथून आरोपी तिला सोबत घेऊन गेला. हेही वाचा - मोठी बातमी! बिहारमध्ये हिंसाचार घडवण्याचं मोठं षडयंत्र? IB कडून अलर्ट जारी याप्रकरणी महिलेने आरोप केला की, प्लॅटफॉर्म 8 आणि 9 च्या दरम्यान रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर आरोपीने तिला एका खोलीत बसण्यास सांगितले. याठिकाणी अनेक उपकरणे देखील ठेवण्यात आली होती. यानंतर आरोपीने त्याच्या तीन मित्रांना बोलावले आणि त्याने आपल्या एका मित्रासह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि इतर दोन साथीदार खोलीच्या बाहेर पहारा देत होते. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.