अजब शिक्षा! आदिवासी महिलेला नग्न करून गावभर फिरवलं, वाचा काय आहे प्रकरण

गावातील लोकांनी या आदिवासी महिलेला (Tribal Woman) घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावाता फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली.

गावातील लोकांनी या आदिवासी महिलेला (Tribal Woman) घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावाता फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली.

  • Share this:
    कोलकाता 15 जून : सध्या युग डिजीटल होत चाललं असलं, तरी अनेक गावांमध्ये मात्र अजूनही काही प्रथा परंपरा अशा आहेत ज्या थक्क करणाऱ्या आहेत. अशीच एक थक्क करणारी घटना आता समोर आली आहे. या घटनेमध्ये महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तिला अजब शिक्षा देण्यात आली आहे. गावातील लोकांनी या आदिवासी महिलेला (Tribal Woman) घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावाता फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली. हा संतापजनक प्रकार पश्चिम बंगालच्या (West Bengal) अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ही घटना 9 जून रोजी घडली असून याप्रकरणी 11 लोकांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना रविवारी तेव्हा समोर आली, जेव्हा घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिलेनं विवाहबाह्य संबंधांमुळे सहा महिन्यांपूर्वी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू;प्रेयसीने बहिणीला सोबत घेऊन केलं भीषण कृत्य मागील आठवड्यात ती आपल्या घरी परतली असता लोकांनी तिच्या घरी जात तिला घराबाहेर काढलं. यादरम्यान तिला शिवीगाळ करण्यात आली. सोबतच विना कपडे संपूर्ण गावात फिरण्यासाठी तिला भाग पाडण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील बनवला गेला. या घटनेनंतर महिला गायब झाली होती. याबाबत कोणीही पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र, नंतर व्हिडिओ व्हायरल होताच या घटनेची माहिती सर्वांना मिळाली. बदला वयात येणाऱ्या मुलींशी वागण्याची पद्धत; चुकूनही सांगू नका ‘या’ गोष्टी घटनेची माहिती मिळताच महिलेचा पती पोलिसांना घेऊन आपल्या सासरी गेला आणि पत्नीला सोबत घेऊन आपल्या घरी परतला. गावी परतल्यानंतर या महिलेनं आपल्या पतीच्या उपस्थितीत आरोपींविरोधात पोलिसांच तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत 11 आरोपींना अटक केली. मात्र, अजूनबी 5 आरोपी फरार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published: