मराठी बातम्या /बातम्या /देश /लग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू; आत्महत्या नव्हे, प्रेयसीनेच केलं भीषण कृत्य

लग्नानंतर चारच दिवसात तरुणाचा मृत्यू; आत्महत्या नव्हे, प्रेयसीनेच केलं भीषण कृत्य

आपल्याला धोका दिला वचन मोडलं आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.

आपल्याला धोका दिला वचन मोडलं आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.

आपल्याला धोका दिला वचन मोडलं आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.

जबलपूर, 14 जून : लग्नानंतर केवळ चारच दिवसात एका तरुणाचा (Youth murder) मृत्यू झाला होता, घरापासून 15 किलोमीटर दूर अंतरावर त्याचा मृतहेह सापडला, सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करत पुढील तपास सुरू केला होता, परंतु आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आपल्याला धोका दिला आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून प्रेयसीनं (Girlfriend Killed Boyfriend) त्याला जंगलात नेवून त्याचा खून केल्याची माहिती आता समोर आली आहे.

24 मे रोजी संबंधित तरुणाचा मृतदेह सापडला होता. आता या प्रकरणाची खरी माहिती समोर आली असून त्याचा खून करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची प्रेयसी होती. तिनं या कामी आपल्या बहिणीची मदत घेतली होती.

प्रेयसीनं घेतला जीव

पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसीची कसून चौकशी केली असता तिने खून करण्यापाठीमागील धक्कादायक कारण सांगितलं. मृत तरुणाने तिला लग्न करण्याचं वचन दिलं होतं. मात्र, त्याने हे वचन पाळले नाही. दुसऱ्याच एका मुलीशी त्यानं लग्न केलं. त्यामुळे ती खूपच नाराज झाली होती. या प्रकाराचा बदला घेण्याचे तिने ठरवले. 16 मे रोजी मृत सोनू पटेल याला तिने आपण शेवटचे भेटायचे आहोत, असे म्हणून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर हे दोघे जण हरगडच्या जंगल भागात बोलण्यासाठी गेले. तेथे आपण काहीतरी वेगळं एडवेंचर करूया असे म्हणून ती त्याच्या पाठीमागे लागली होती. त्यानंतर तिने सोनू चे हात पाय आणि तोंड देखिल बांधले. नंतर त्याला उलटे झोपवून दगडाने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. त्यामुळे सोनूचा मृत्यू झाला.

ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवेशसिंग बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी हरगडच्या जंगलात एका तरुणाचा सांगाडा सापडला होता. त्याची दुचाकीही थोड्या अंतरावर सापडली. या दुचाकीवरून सिहोरा येथील रहिवासी सोनू पटेल असे या युवकाचे नाव असल्याचे समजले. सोनूचे 12 मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर चार दिवसांनी 16 मे रोजी तो सिहोरा येथे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो सापडू शकला नाही आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी हरवलेल्या व्यक्तीचा अहवाल दिला.

त्यानंतर 24 मे रोजी हरगडच्या जंगलातून मृतदेहाचा पोस्टमार्टम व एफएसएल अहवाल आल्यानंतर तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना मृताच्या नवविवाहित पत्नीने  कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे त्याचे शेवटचे बोलणे मधु नावाच्या मैत्रिणीशी झाल्याचे सांगितले. पोलिसांनी मृताची मैत्रिणी मधु आणि तिच्या बहिणीची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. या प्रकारामुळं सर्वजणच आश्चर्यचकीत झाले.

First published:
top videos

    Tags: Love, Love story, Madhya pradesh, Murder