मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विकृतीपणाचा कळस, नशेबाज तरुणाने कुत्र्यावर ब्लेडने केले सपासप 12 वार, LIVE VIDEO

विकृतीपणाचा कळस, नशेबाज तरुणाने कुत्र्यावर ब्लेडने केले सपासप 12 वार, LIVE VIDEO

कुत्र्याच्या मालकाने फिर्याद दिल्यास प्राणी हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कुत्र्याच्या मालकाने फिर्याद दिल्यास प्राणी हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कुत्र्याच्या मालकाने फिर्याद दिल्यास प्राणी हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

उल्हासनगर, 29 एप्रिल: सध्या अनेक ठिकाणी प्राणी हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.अनेक प्रकरणांमध्ये प्राणी हिंसा करणाऱ्या कडक शासन होते. मात्र तरीदेखील अशा घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही. उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नशेबाज तरुणाने कुत्र्यावर (Dog) ब्लेडने वार करत हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माथेफिरू तरुणाने कुत्र्यावर ब्लेडने वार करतानाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या महात्मा फुले कॉलनी भागात राहणारा सागर नरवाडे या तरुणाने कुत्र्यावर हल्ला केला आहे. बुधवारी रात्री  दीडच्या सुमारास हा माथेफिरू तरुण इथे नशेच्या धुंदीत फिरत होता. याच वेळी कुत्रा त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने हातात असलेल्या ब्लेडने कुत्र्यावर 12 वार केले. यात कुत्राच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या माथेफिरु तरुणाने नशा केली होती आणि त्या धुंदीत असल्याने त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान, या प्रकाराची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतले आणि समज देत कारवाई केली आहे. मात्र, कुत्र्याच्या मालकाने फिर्याद दिल्यास प्राणी हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कुत्र्याचे मालक पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राजीव कपूर यांची संपत्ती मिळणार कोणाला?; कोर्टानं कुटुंबीयांसमोर ठेवला हा मार्ग

दरम्यान या माथेफिरु तरुणाची आपल्या भावाचे काहीतरी कारणावरून वाद विवाद झाले होते. त्याच रागात त्याने हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे, कुत्र्यावर ब्लेडने हल्ला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्या माथेफिरू तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्राणी मित्र संघटना करत आहेत.

First published:

Tags: Crime, Dog, Ulhasnagar, Ulhasnagar news