मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजीव कपूर यांची संपत्ती मिळणार कोणाला?; कोर्टानं कुटुंबीयांसमोर ठेवला हा मार्ग

राजीव कपूर यांची संपत्ती मिळणार कोणाला?; कोर्टानं कुटुंबीयांसमोर ठेवला हा मार्ग

कपूर कुटुंबात पेटला मालमत्तेचा वाद; राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र हरवल्यामुळं निर्माण झाला नवा तेढ

कपूर कुटुंबात पेटला मालमत्तेचा वाद; राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र हरवल्यामुळं निर्माण झाला नवा तेढ

कपूर कुटुंबात पेटला मालमत्तेचा वाद; राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र हरवल्यामुळं निर्माण झाला नवा तेढ

मुंबई 29 एप्रिल: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं अलिकडेच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच कपूर कुटुंबीयांवर एक नवं संकट कोसळलं आहे. कुटुंबात त्यांच्या मालमत्तेवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या मालमत्तेवर भाऊ रणधीर कपूर (Randhir Kapoor) आणि बहीण रीमा जैन (Rima Jain) यांनी दावा केला आहे. परंतु हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घटस्फोटाचे कागदपत्र सादर करावी लागतील. (Rajiv Kapoor's property settlement) मात्र सध्या ते कोणाकडेच सापडत नाहीयेत. त्यामुळं मालमत्ता कोणाला मिळणार? याबाबत एक नवा तेढ निर्माण झाला आहे.

प्रकरण नेमकं आहे तरी काय?

राजीव कपूर यांनी 2001 साली आरती सबरवाल नामक महिलेशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार दिर्घ काळ चाचला नाही. त्यांनी 2003 मध्ये घटस्फोट घेतला. परंतु त्यांनी या घटस्फोटाची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली नव्हती. ते मुंबई आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी राहायचे. त्यामुळं ही कागदपत्र त्यांनी नेमकी कुठे ठेवली याबाबत त्यांना कल्पना नाही. असा दावा कपूर कुटुंबीयांनी कोर्टात केला होता. यावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी असा आदेश दिला की, कपूर कुटुंबाला पेपर्स सादर करण्यापासून सूट दिली जाऊ शकते, परंतु आरती सबरवाल यांच्याकडून त्यांना तशी मान्यता मिळाली पाहिजे, जेणेकरून पुढे वाद कोणतेही होऊ नयेत.

‘पोकळ बडबड थांबव अन् ऑक्सिजन पुरव’; राखी सावंतनं घेतला कंगनाशी पंगा

राजीव कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत ‘राम तेरी गंगा मैली’ नावाचा एक सुपरहिट चित्रपट दिला होता. हा चित्रपटांची निर्मिती त्यांचे वडील राज कपूर यांनी केली होती. पण या चित्रपटाचं पूर्ण श्रेय मिळालं ते अभिनेत्री मंदाकिनी हिला. तिची बोल्ड भूमिका प्रचंड गाजली अन् राजीव कपूर जणू सहाय्यक भूमिकेत उरले. त्यानंतर राज कपूर यांनी त्यांच्यासाठी कोणताही चित्रपट बनवला नाही, ज्यामुळे राजीव त्यांच्या वडिलांवर नाराज झाले आणि कुटुंबापासून वेगळे राहू लागले होते.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment