मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रिक्षाचं भाडं मागणं पडलं महागात; प्रवाशाने चालकाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

रिक्षाचं भाडं मागणं पडलं महागात; प्रवाशाने चालकाच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

एका प्रवाशाला रिक्षाचं भाडं मागणं संबंधित रिक्षा चालकाच्या जीवावर बेतलं आहे. रिक्षा भाड्याचे 200 रुपये मागितल्याने संबंधित प्रवाशानं रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 12 मार्च: पॉर्न व्हिडिओ दाखवून पतिचे हात खुर्चीला बांधून गळा चिरल्याची घटना ताजी असताना नागपूरला हादरा देणारी दुसरी घटना समोर आली आहे. एका प्रवाशाला रिक्षाचं भाडं मागणं संबंधित रिक्षा चालकाच्या जीवावर बेतलं आहे. रिक्षा भाड्याचे 200 रुपये (Rs 200 Rickshaw Fare) मागितल्याने संबंधित प्रवाशानं रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या (Passenger Killed Rickshaw Driver) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवासी अनंतराम रजतला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंतराम रजत हा आपल्या पत्नीसोबत खरबी येथून रिक्षाने हुडकेश्वर आऊटर रिंगरोड येथील टाईल्स कंपनीत जात होता. या प्रवासाचं भाडं 200 रुपये झालं होतं. गंतव्य स्थानावर पोहचल्यानंतर रिक्षा चालकाने प्रवासी अनंतराम रजत यांच्याकडे प्रवासाच्या भाड्याची मागणी केली. पण अनंतरामकडे काहीचं पैसे नव्हते. यानंतर रिक्षा चालक आणि अनंतराम यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळही केली. त्यानंतर या हा वाद वाढत गेला.

(वाचा - पुणे : बाळाच्या पोटात वाढत होता आईचा दुसरा गर्भ;रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले)

त्यामुळे संतापलेल्या आरोपी अनंतरामने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर अनंतराम रजतने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तेथील काही लोकांनी या हत्येची माहिती नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी काही तासातचं आरोपी प्रवाशाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असून त्याला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरून अटक केली आहे.

(वाचा -पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना)

हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी सांगितलं की, आरोपी प्रवासी अनंतराम रजतने अवघ्या 200 रुपयांसाठी रिक्षा चालकाची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

First published:

Tags: Autorickshaw driver, Crime news, Death, Maharashtra, Murder, Nagpur, Shocking news