मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना

पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना

 या हत्येत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपी महिलेला मृतकापासून 8 वर्षाचा मुलगा होता.

या हत्येत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपी महिलेला मृतकापासून 8 वर्षाचा मुलगा होता.

या हत्येत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपी महिलेला मृतकापासून 8 वर्षाचा मुलगा होता.

  • Published by:  sachin Salve

 तुषार कोहळे, प्रतिनिधी

नागपूर, 11 मार्च :  नागपूर (Nagpur) शहरातील गणेशपेठ (Ganesh Peth Police station Nagpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 65 वर्षीय व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) करण्यात आली होती. अखेर या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतकच्या पाचव्या बायकोने नवऱ्याला इंटरनेटवरील आक्षेपार्ह पॉर्न व्हिडीओ (porn Video) दाखवून त्याची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.

नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 मार्च रोजी रजत संकुल या इमारतीच्या प्लॅट क्रमांक 103 मध्ये लक्ष्मण मलिक यांची हत्या झाली होती. हत्येनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झल्यानंतर जे दृश्य पुढे आले तेव्हा पोलिसांच्या देखील पायाखालची वाळू सरकली होती. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले.

धक्कादायक! पत्नीने पतीचा खून करून मृतदेह घराबाहेरच पुरला, कारण ठरलं...

लक्ष्मण मलिक हे सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झाले असून सफाई कर्मचारी होते व त्यांची पाच लग्न झाल्याची माहिती पुढे आली होती. सोबतच ते आर्थिक संकटात असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्व बाजूचा विचार करून आरोपीचा शोध सुरू केला. मृतकचा फोन तपासला असता त्याची पाचवी बायको स्वाती ही त्याला शेवटच्या क्षणाला संपर्कात असल्याचे निदर्शनात आले. त्यांनतर पोलिसांनी स्वातीला तपासासाठी बोलावले. सुरवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र, पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याने तिला खाक्या दाखवताच तिने सर्व हकीकत सांगितली.

'नवा व्हायरस नव्हे तुम्ही जबाबदार', केंद्राने सांगितलं रुग्णवाढीचं कारण

हत्येच्या दिवशी ती दुपारची अडीच वाजता मृतक लक्ष्मण मलिक यांना भेटायला आली होती. स्वाती हिने लक्ष्मण मलिक यांना पॉर्न व्हिडीओ दाखवून उत्तेजित केले. त्यानंतर लक्ष्मण मलिक यांचे खुर्चीला हात पाय बांधले आणि जवळच्या चाकूने गळा कापला व हत्या केली. आरोपी स्वाती हिचे आणखी एका व्यक्ती सोबत अनैतिक संबंध होते. त्यावर दोघांमध्ये खटके उडत होते. सोबत मृतक याचे पीएफमध्ये असलेले पैसे व कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

या हत्येत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपी महिलेला मृतकापासून 8 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या कस्टडीवरून देखील दोघांमध्ये वाद होता. मृतक हा आरोपी स्वातीकडे असलेले आपल्या पीएफ खात्याच्या एटीएमकार्ड परत मागत होता, त्यावरून सुद्धा पती पत्नीत खटके उडत होते. त्यामुळे आरोपी स्वातीने हे पाऊल उचलल्याचे तपासात पुढे आले. या हत्याकांडासाठी स्वातीने जो मार्ग निवडला ते ऐकून पोलीसही हैराण झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: नागपूर