पुणे : बाळाच्या पोटात वाढत होता आईचा दुसरा गर्भ; चाचणीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले

पुणे : बाळाच्या पोटात वाढत होता आईचा दुसरा गर्भ; चाचणीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले

एका 18 महिन्यांच्या मुलाच्या पोटात गर्भ (baby boy born with womb) आढळला आहे. डॉक्टरांनी अत्यंत जटील ठरलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून बाळाच्या पोटात गर्भ कसा निर्माण झाला, याचं स्पष्टीकरणही डॉक्टरांनी दिलं आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 12 मार्च: पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 18 महिन्यांच्या मुलाच्या पोटात गर्भ (baby boy born with womb) आढळला आहे. याप्रकरणाने सुरुवातीला डॉक्टरही चक्रावले होते. मात्र पिंपरीतील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी अत्यंत जटील ठरलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसंच डॉक्टरांनी बाळाच्या पोटातून अर्धा किलो वजनाचा मृत गर्भ बाहेर काढला आहे. या घटनेनं रुग्णालयात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शस्त्रक्रिया पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रात पार पडली आहे. संबंधित मुलाची आई मुळ नेपाळ येथील रहिवासी असून तिने 18 महिन्यांपूर्वी आपल्या बाळाला जन्म दिला होता. पण महिलेच्या प्रसूतीनंतर बाळाच्या आरोग्यांच्या अनेक समस्या उद्भवत होत्या. बाळाच्या पोटात सातत्याने दुखत होतं. तर अलीकडच्या काही काळात बाळाचं पोट गरोदर महिलेप्रमाणे फुगायला सुरू झालं होतं. त्यामुळे आपल्या बाळाला नेमकं काय झालं आहे, हे पाहण्यासाठी तिने आपल्या बाळाला पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल केलं.

त्यानंतर येथील बाल रोग्य तज्ज्ञांनी बाळाच्या विविध चाचण्या केल्या, या चाचण्यांमधून मिळालेल्या माहितीनंतर डॉक्टरही चक्रावले. सर्व चाचण्यांची पुष्टी झाल्यानंतर डॉक्टरांनी हा धक्कादायक खुलासा केला. डॉक्टरांनी सांगितलं की, संबधित मुलाच्या आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. पण यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भात गेल्याने ही गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. बाळाने जन्म घेतल्यानंतर बाळाच्या पोटातील ही गर्भरुपी गाठ वाढत गेली, आणि बाळाला त्रास व्हायला लागला.

(वाचा - अरे देवा! ब्रेन सर्जरी सुरू असतानाच अचानक रुग्णाला आली जाग आणि...)

याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होतं होता. त्यामुळे बाळाच्या पोटातील हा मृत गर्भ बाहेर काढणं खूपच गुंतागुंतीचं आणि जिकरीचं काम होतं. पण डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी ही जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यावेळी डॉक्टरांनी  सांगितलं की, संबंधित मृत गर्भ हा बाळाच्या यकृत आणि उजव्या बाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध होता. तसंच डॉक्टरांनी तपासाअंती हा गर्भ अविकसित आणि मृत असल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी 6 तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हा गर्भ काढला आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Published by: News18 Desk
First published: March 12, 2021, 4:39 PM IST

ताज्या बातम्या