जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Murder Mystery : रक्ताच्या एका थेंबामुळे 30 वर्षांनी उकललं जोडप्याच्या हत्येचं गूढ; जावईच निघाला आरोपी

Murder Mystery : रक्ताच्या एका थेंबामुळे 30 वर्षांनी उकललं जोडप्याच्या हत्येचं गूढ; जावईच निघाला आरोपी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कालांतराने काहीच माहिती मिळत नसल्याने तपासाची फाईल बंद झाली. पण अचानक एका नवीन अधिकाऱ्याला या प्रकरणात इंटरेस्ट निर्माण झाला आणि तो ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याच्या कामाला लागला.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 17 ऑक्टोबर : चित्रपटांमध्ये आपण हत्येची जुनी प्रकरणं आणि अनेक वर्षांनी त्याचा खुलासा होताना पाहिलं असेल. पण असंच एक रिअल लाइफ प्रकरण समोर आलंय. यामध्ये पोलिसांनी तीन दशकांपूर्वी झालेल्या डबल मर्डरची मिस्ट्री सोडवली आहे. विशेष म्हणजे रक्ताच्या एका थेंबाच्या मदतीने पोलिसांना या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात यश आलंय. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील व्हरमाँट राज्यातील पोलिसांनी रक्ताच्या एका थेंबाच्या मदतीने तीन दशकं जुन्या हत्येच्या घटनेचं गूढ उकललं. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय. व्हरमाँट स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 76 वर्षीय जॉर्ज पीकॉक आणि 73 वर्षीय कॅथरीन पीकॉक हे दाम्पत्य सप्टेंबर 1989 मध्ये डॅनबी येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळलं होतं. दाम्पत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, पण घरात कोणीही जबरदस्तीने घुसल्याचा पुरावा मिळाला नव्हता. या प्रकरणात पोलीस पुरावे शोधत राहिले, परंतु गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल, असा कोणताच पुरावा त्यांना मिळाला नाही. मात्र तब्बल 30 वर्षांनंतर पोलिसांना एक असा पुरावा मिळाला, ज्याच्या मदतीने गुन्हेगारांची तुरुंगात रवानगी झाली. मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; भंडाऱ्यातील अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड व्हरमाँट स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 79 वर्षीय अँथनी लुईसला गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) या हत्येप्रकरणी अटक केली. लुईसला व्हरमाँटमध्ये प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी न्यूयॉर्कमध्ये तुरुंगात टाकण्यात आलंय. या जोडप्याच्या हत्येच्या वेळी लुईसचं लग्न जोडप्याच्या मुलीशी झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या हत्येनंतर दोनच आठवड्यांनंतर लुईसच्या सासरच्या लोकांनी त्याच्यावर संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी लुईसच्या विरोधात बरेच पुरावे शोधले; पण त्या तोच खुनी असल्याचं सिद्ध करण्यात यश आलं नाही. कालांतराने काहीच माहिती मिळत नसल्याने तपासाची फाईल बंद झाली. पण अचानक एका नवीन अधिकाऱ्याला या प्रकरणात इंटरेस्ट निर्माण झाला आणि तो ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याच्या कामाला लागला. अशातच मे 2020 मध्ये फॉरेन्सिक टीमने एका अहवालातून धक्कादायक खुलासा केला. रुग्णालयाच्या छतावर आढळले 200 कुजलेले मृतदेह; शरीराचे अवयव अन् कपडेही गायब, पाकिस्तानात खळबळ टीमने सांगितलं, की ऑक्टोबर 1989 मध्ये लुईसच्या कारमध्ये सापडलेला रक्ताच्या एका थेंबाचा डाग होता, तो जॉर्ज पीकॉकचा होता. दोघांचे डीएनए मॅच झाले होते. खरं तर हत्येच्या 1 महिन्यानंतर पोलिसांना जॉर्जच्या गाडीतून रक्ताचा 1 थेंब सापडला होता, पण कोणीही त्यावर गांभीर्याने विचार केला नाही आणि तो पुरावा म्हणून गोळा करूनही लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवला नाही. नंतर नवीन तपास अधिकाऱ्याने तो थेंब टेस्टिंगसाठी पाठवला आणि जावईच या दाम्पत्याच्या हत्येचा आरोपी होता हे तीन दशकांनी उघड झालं. सध्या लुईस तुरुंगात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात