पुणे, 7 मार्च : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास होतो, म्हणून तरुणाने पिल्लांना विषारी औषध देऊन मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश सोनवणे (रा. रामनगर वारजे पुणे) असं या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात प्राणीप्रेमी अनिकेत संजय राजपूत यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी नागेश सोनवणेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मांसामधून दिले विष घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सिद्धार्थनगमधील रामनगर परिसरात बापु घनगांवकर यांचे मोकळ्या पडीक जागेत घर आहे. त्यांनी तीन कुत्र्यांची पिल्ले पाळली होती. मात्र या कुत्र्यांच्या पिल्लाचा आरोपी नागेश सोनवणे याला त्रास होत होता. त्यामुळे त्याने उंदीर मारण्याचे औषध मांसामधून या पिल्लांना खायला दिले. विषारी मांस खाल्ल्यामुळे या तिन्ही पिल्लांचा मृत्यू झाला. आरोपीविरोधात अनिकेत संजय राजपूत यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी नागेश सोनवणेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी नागेश सोनवणेविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 428 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 119 चे ‘द प्रिव्हेनशन ऑफ अरुलटी अॅनिमल्स अॅक्ट 1960 चे कलम 11 सी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.