डोंबिवली, 28 एप्रिल: मास्क (Mask) न लावलेल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर कुत्रे (Dog) सोडल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत (Dombivali) समोर आला आहे. ही कारवाई करत असतांना 3 जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत पालिका पथक आणि पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. या हल्ल्यात कुत्र्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायाला चावा घेत पोलिसाला जखमी केले आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस (Dombivali police) ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक आजही विना मास्क फिरताना आढळून येतात. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात महापालिका पथक आणि पोलीस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मात्र बेजबाबदार नागरिक अनेकदा कारवाई दरम्यान पोलीस आणि पालिकेच्या पथकाशी हुज्जत घालतात.
617 कोरोना व्हेरिएंट्सवर भारी COVAXIN; भारतीय कोरोना लशीबाबत अमेरिकचा मोठा दावा
डोंबिवलीमध्ये मंगळवारी एक असाच विचित्र प्रकार घडला. डोंबिवली खंबाळपाडा रोड लगत मास्क न लावलेल्या नागरिकांवर महापालिका भरारी पथककाकडून आणि पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू होती. याच दरम्यान इथे असलेल्या गणेश ऑटोमोबाईल हे गॅरेज सुरू ठेऊन दुकानाचे मालक आणि दोन जण दुकानाबाहेर विना मास्क उभे होते. याच वेळी भरारी पथक आणि पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी गॅरेजचे शटर उघडे ठेवून बाहेर विना मास्क बाहेर का उभे आहेत, अशी विचारणा पालिका पथक आणि पोलिसांनी केली.
Pune Crime: शिरूरमध्ये दगडानं ठेचून अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
मात्र, या वेळी तिघांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी पाळलेला कुत्रा पोलिसांच्या आणि पालिका पथकाच्या अंगावर सोडला. यात कुत्र्याने पोलीस कर्मचारी घाडगे यांच्या पायाला चावा घेत त्यांना जखमी केले आहे. या प्रकरणी डोंबिबली पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता, आदित्य गुप्ता या तिघांना विरोधात भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार, सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यात दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.