वॉशिंग्टन, 28 एप्रिल : जगात कोणती कोरोना लस (Covid Vaccine) सर्वात चांगली आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. भारतात सध्या दोन कोरोना लशी दिल्या जात आहे. त्यात मेड इन इंडिया कोवॅक्सिनचाही (Covaxin) समावेश आहे. कोरोना लस घेताना तुमच्या मनात लशीबाबत अनेक प्रश्न असतील. पण अमेरिकेनेही भारताच्या कोरोना लशीची क्षमता ओळखली आहे. भारताची कोरोना लस कोवॅक्सिन कोरोनाव्हायरसच्या 617 व्हेरिएंट्सवर प्रभावी आहे, असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील महासाथीचे तज्ज्ञ आणि व्हाइट हाऊसचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फॉसी (Dr Anthony Fauci) यांनी भारतीय कोरोना लशीच्या प्रभावाबाबत सांगितलं आहे. फॉसी म्हणाले, इथं असं काही आहे, जिथं आम्ही अजूनही डेटा जमा करत आहोत. कोविड 19 चा कॉन्वालॅसेन्ट सेरा आणि भारतात ज्या लोकांना कोवॅक्सिन देण्यात आली त्यांची माहिती आम्ही घेतली. ही लस कोरोनाच्या 617 व्हेरिएंट्सचा निष्क्रिय करत आहे. सध्या भारताला आपण ज्या अडचणीत पाहत आहोत. त्यानंतरही लसीकरण याविरोधात एक महत्त्वाचं असं अँटिडोट ठरू शकतं. हे वाचा - टेस्टिंग कमी म्हणून मुंबईतील कोरोनाचा आकडा घटला? BMC आयुक्तांनी केला मोठा खुलासा हैदराबादच्या भारत बायोटेकने तयार केलेली ही लस. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने ही लस तयार करण्यात आली आहे. 3 जानेवारीला भारतात या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती. न्यूयॉर्क टाइम्सने मंगळवारी सांगितलं, कोवॅक्सिन SARS-CoV-2 विरोधात रोगप्रतिकारक प्रणालीला अँटिबॉडी तयार करण्यास भाग पाडते. हे वाचा - व्हॅक्सीन म्हणजे काय ? जाणून घ्या कसं काम करतं ? भारताला मदत करण्याबाबत व्हाइट हाऊसचे कोव्हिड 19 रिस्पॉन्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अँडी स्लॅविट यांनी सांगितलं, आम्ही या कठीण प्रसंगी भारतासोबत आहोत. भारताला रॅपिड टेस्टिंग किट्स, वेंटिलेटर्स, पीपीई आणि लस निर्मितीसाठी आवश्यक कच्चा मालासह इतर संसाधने पुरवण्याचं काम करत आहोत. भारतासोबत कायम काम करणारी सीडीसी भारताच्या मदतीसाठी स्ट्राइट टीम पाठवेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







