ग्वाल्हेर, 18 जानेवारी : अनेक कारणांमुळे पती-पत्नीमध्ये (Husband and wife) वाद होत असतात. मात्र या नात्यात संशयाची पाल चुकचुकली की नातं कलुषीत होतं. त्यातून वाद वाढतात. काही जणांचा स्वत:वर ताबा राहत नाही आणि यातच अघटिक होऊन बसतं. असाच प्रकार समोर आला आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या तिच्या डॉक्टर पतीने तिचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने तिचा मृतदेह 24 तास घरात लपवून ठेवला आणि यादरम्यान यूट्यूब व क्राईम सीरियलमध्ये पत्नीचा मृतदेह लपविण्यासाठी पर्याय शोधू लागला. त्यानंतर रात्री उशिरा त्याने मृतदेह झाडांमध्ये टाकून आग लावली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याशिवाय पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.
एसपी अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी हत्याचं कारण पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचं सांगितलं आहे. चौकशीत आरोपीने सांगितलं की, लग्नानंतर जेव्हा दोघं हनिमूनसाठी गेले तेव्हा त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत चॅट करताना रंगेहात पकडलं होतं. यानंतर अनेक वेळा त्याने पत्नीला दुसऱ्या पुरुषांसोबत बोलण्यावरुन रोखलं होतं, मात्र तिने ऐकलं नसल्याचं आरोपीने सांगितलं.
हे ही वाचा-क्रूरतेचा कळस! मुलगा भारत-चीन सीमेवर देशसेवा करतोय; येथे आईला जिवंत जाळलं
गुरुवारी यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात पतीने पत्नीला मारहाण केली. त्याने तिला गळ्यावर मुक्का मारला. यामुळे ती खाली कोसळली. यानंतर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. त्याने पत्नीचा मृतदेह 24 तास बेडरुममध्ये ठेवला होता, त्याने फ्रीजरमधून बर्फ काढला आणि तिच्या मृतदेहावर ठेवला. तो रात्रभर खोलीत फ्रेशनर स्प्रे करीत होता. ही माहिती त्याने यूट्यूबवरुन काढली होती. असं केल्यानं मृतदेहाचा दुर्गंध येत नसल्याचं त्याने पाहिलं होतं.
हे ही वाचा-22 हजार जणांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक!
शनिवारी एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह पोलिसांना सापडला. ती महिला दर्पण कॉलनीतील निवासी डॉ. संजय सिंह यांची पत्नी सुर्या असल्याचं समोर आलं. हत्या केल्याच्या 24 तासांनंतर डॉ. संजयने मृतदेहाचे हात-पाय बांधले आणि त्याला एक गोणीत भरलं. मृत महिलेची उंची कमी होती, याकारणाने तिला गोणीत भरलं व स्कूटरवर गोणी ठेवली. शुक्रवारी रात्री मेट्रो टॉवरजवळील झाडांमध्ये मृतदेह घेऊन गेला. यापूर्वी त्याने पेट्रोल पंपातून पेट्रोल खरेदी केलं आणि त्यानंतर झाडांमध्ये मृतदेह टाकून आग लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Wife and husband