मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बोगस वेबसाईटच्या माध्यमातून 22 हजार जणांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक!

बोगस वेबसाईटच्या माध्यमातून 22 हजार जणांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक!

आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. फेसबुक (Facebook) आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करत त्यानं आत्तापर्यंत 22 हजार जणांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. फेसबुक (Facebook) आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करत त्यानं आत्तापर्यंत 22 हजार जणांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. फेसबुक (Facebook) आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करत त्यानं आत्तापर्यंत 22 हजार जणांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

मुंबई, 18 जानेवारी :  सोशल मीडियावरील (Social Media) आकर्षक जाहिराती पाहून खरेदी करण्याचा मोह बहुतेकांना होतो. ज्या वेबसाईटच्या (Website) माध्यमातून आपण खरेदी करत आहोत ती वेबसाईट खरी आहे की बोगस? याची खात्री देखील अनेक जण करत नाहीत. लोकांच्या याच निष्काळजीपणाचा फायदा घेऊन बोगस वेबसाईट चालवणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला मुंबईतील सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे.

काय आहे प्रकार?

मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आशिष बिपीनभाई आहिर या 32 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला (Software Engineer)  अटक केली आहे. मुळचा गुजरातमधील सुरतचा रहिवासी असलेल्या  आशिषनं लंडनच्या (London) प्रतिष्ठित संस्थेमधून शिक्षण घेतले होते. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात त्यानं लंडनमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर स्वत:ची कर्ज फेडण्यासाठी त्यानं बोगस वेबसाईट (Fake Website) बनवली आणि लोकांची फसवणूक सुरु केली.

22 हजार जणांची फसवणूक

आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. फेसबुक (Facebook) आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करत त्यानं आत्तापर्यंत 22 हजार जणांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये 90 टक्के महिलांचा समावेश आहे. दागिने, महिलांचे ड्रेस मटेरियल या प्रकारच्या महिलांच्या उपयोगी साहित्याची आशिष प्रामुख्यानं विक्री करत असे.

कसा झाला प्रकार उघड?

एका महिलेनं आशिषच्या वेबसाईटवरुन 2400 पेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर दिली होती. या महिलेला ऑर्डर केलेलं साहित्य मिळालं नाही. तसंच तिचे पैसे देखील परत मिळाले नाहीत. त्यामुळे तिने सायबर पोलिसांकडं तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात  बोगस वेबसाईटचं प्रकरण उघडकीस आलं आहे. आशिषवर फसवणूक तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

काय खबरदारी घ्याल?

इंटरनेटवरुन ऑनलाईन खरेदी करताना स्वस्त किंमतीमध्ये खरेदी करण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा प्रकारची मोठी सुट देणारी खरेदी करण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शक्य असेल तेंव्हा खरेदीचं साहित्य मिळाल्यानंतर पैसे देणे हा पर्याय निवडावा. त्याचबरोबर नव्या वेबसाईटमधून खरेदी करण्यापूर्वी त्यावर यापूर्वी साहित्य खरेदी केलेल्या ग्राहकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, हे देखील पाहणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Crime, Cyber crime