पठाणकोट, 18 जानेवारी : सैनिक देशाचं रक्षण करताना आपलं कुटुंब मागं ठेवतात. मनावर दगड ठेवत आपल्या लोकांपासून दूर राहून ते अहोरात्र सीमांचं रक्षण करतात. मात्र त्यांच्याच कुटुंबावर आघात केला गेल्याचं विदारक वास्तव समोर आलं आहे. पंजाबच्या (Punjab) पठाणकोट (Pathankot) जिल्ह्यात दुरंगखड्ड गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या विवादातून (land dispute) एका महिलेवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं गेलं. ही महिला एका जवानाची आई (mother of a Jawan) होती. दर्शना देवी असं या साठवर्षीय महिलेचं नाव आहे.
तिला लगोलग मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये (military hospital0 भर्ती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान रविवारी तिनं प्राण सोडला. या दर्शना देवी यांचा मुलगा राजेश कुमार हा सध्या भारत-चीन बॉर्डरवर (India-China border) ड्युटी करतो आहे. महिलेनं मृत्यूपूर्वी पोलिसात (police) आपला जबाब नोंदवला. त्यात तिनं शेजारी भगवान दास, त्यांचा मुलगा सनी आणि मुनीशला जबाबदार ठरवलं.
हे ही वाचा-Farmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन?
महिलेनं सांगितलं, की त्या 14 जानेवारीच्या सकाळी गायीचं दूध काढत होत्या. त्यादरम्यान मागच्या दरवाज्यानं आलेला भगवान दास आणि इतरांनी तिच्यावर हल्ला केला. तिला पकडत अंगावर रॉकेल ओतलं. तिनं विरोध करतानाही शरीराला आग लावली आणि तिथून पळून गेले. महिलेनं मदतीसाठी धावा केल्यावर इतर शेजारी आले आणि त्यांनी आग विझवली. तिला लगोलग हॉस्पिटलला नेण्यात आलं. पोलिसांनी भगवान दास आणि त्याच्या मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्यात हत्येचं कलमही जोडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, महिलेचा पती किशोरी लाल याच्या सांगण्यानुसार, याआधीही याच लोकांनी दर्शना यांना मारहाण केली होती. याची तक्रार पोलिसांना दिल्यावरही तेव्हा कुठलीच कारवाई झाली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.